प्रभुराज प्रतिष्ठाण, लातूरच्या वतीने पालावरील कष्टकरी परिवाराला दिवाळी भेट

प्रभुराज प्रतिष्ठाण, लातूरच्या वतीने पालावरील कष्टकरी परिवाराला दिवाळी भेट

लातूर (प्रतिनिधी) : रोजी प्रभुराज प्रतिष्ठाण, वतीने दिवाळी सणा निमित्त पालात राहणाऱ्या परिवारासोबत दिवाळी फराळ, साडी, उटणं, तेल, साबण, पेस्ट भेट देऊन दिवाळी सण साजरी करण्यात आला आयुष्यभर काबाडकष्ट करुण जीवन जगणाऱ्या पोटाची खळगी भरण्यासाठी गेल्या सतरा वर्षापासून जिल्हाधिकारी कार्यालया समोर पाल ठोकुन लोखंडी औजारे बनवीणाऱ्या भटक्या जाती,जमातीतिल कुटुंबाना हक्काचे घर नाही की जमीन परंतु परिस्थितिशी दोन हात करीत हे कुटुंब जीवनाचा एक एक दिवस तापलेल्या लोखंडावर घाव घालून त्याला घडविन्यात घालत आहे. कुठे दाद ना तक्रार मिळेल त्या मजूरीतुन कुटुंबाचा पालात गाडा चालविने, हा त्यांचा सिस्ता राहिला आहे. प्रभुराज प्रतिष्ठान मित्राने पालावर जाऊन तेथील परीवाराला दिवाळी भेट देऊन दिवाळीच्या शुभेच्छा दिले. यावेळी प्रतिष्ठाण अध्यक्ष अँड. अजय कलशेट्टी,किरण जाधव, जेष्ठ नागरिक लक्ष्मीमंन लोहारे, प्रल्हादराव शिंदे, विलास भूमकर, बाबुभाई शेख, अभिशेक जाधव, राम ढुमणे, ज्ञानोबा मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!