रेकॉर्डवरील अट्टल घरफोड्यास पंढरपूर येथून Unit-2 ने ठोकल्या बेड्या, घरफोडीचे 5 गुन्हे उघड करण्यात यश
पुणे (रफिक शेख) : भारती विद्यापीठ पो.स्टे. CR No 592/22 IPC 457, 380 या गुन्ह्याचा समांतर तपास वरिष्ठांच्या आदेशनवये Unit-2 प्रभारी मा. क्रांतिकुमार पाटील यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली सुरू असताना सदरचा गुन्हा हा आरोपी नामे शमशुद्दीन जंबुवाले रा. कर्वेनगर कोथरूड पुणे याने केल्याची व तो सध्या मु.पो. गंदेगाव ता.पंढरपूर जि. सोलापूर येथे एक शेतामध्ये शेतगडी म्हणून खात्रीशीर बातमी पो.अ. उज्ज्वल मोकाशी व संजय जाधव गजानन सोनुने याना मिळाली होती. सदरबाबत Unit-2 प्रभारी मा.क्रांतिकुमार पाटील सो. याना अवगत करता, त्यांनी तात्काळ PSI पाटोळे व PSI कांबळे यांचे दिमतीत टीम तयार करून पंढरपूर येथे रवाना केली. वरील टीमने बातमी ठिकाणी सापळा लावून आरोपीस ताब्यात घेऊन त्यास चौकशीकामी Unit-2 कार्यालयात आणून त्यांचेकडे कसून तपास करता, त्याने पुणे आयुक्तालयात 5 ठिकाणी घरफोड्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्याची माहिती खलील प्रमाणे.
(1) भारती विद्यापीठ CR No 592/22 IPC 457 380
(2) भारती विद्यापीठ CR No 565/22 IPC 454 457 380
(3) भारती विद्यापीठ CR No 635/22 IPC 454 380 427
(4) भारती विद्यापीठ CR No 611/22 IPC 454 380
(5) कोथरूड CR No 218/22 IPC 457 454 380
वरील गुन्ह्यात चोरीस गेलेले 100 ग्रॅम सोन्याचे दागिने व 200 ग्रॅम चांदी तसेच रोख 42,000/- ₹ असा एकूण ₹ 5,46,500/-किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे
सदरची उल्लेखनीय कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री अमिताभ गुप्ता, पोलीस सह आयुक्त श्री संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री रामनाथ पोकळे, पोलीस उप-आयुक्त गुन्हे श्री. श्रीनिवास घाडगे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे-1 श्री.गजानन टोम्पे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील, यांचे मार्गदर्शनाखाली API वैशाली भोसले, API विशाल मोहिते, PSI राजेंद्र पाटोळे, PSI नितीन कांबळे, पो.अ. उज्वल मोकाशी, संजय जाधव, गजानन सोनुने, मोहसीन शेख, उत्तम तारू, नागनाथ राख, साधना ताम्हाणे, रेश्मा उकरंडे, शंकर नेवसे, गणेश थोरात, विजय पवार, विनोद चव्हाण, नामदेव रेणुसे, कादिर शेख, समीर पटेल, प्रमोद कोकणे या टीमने केलेली आहे.