बाळासाहेबांची शिवसेनेचा पदाधिकारी,पक्ष प्रवेश शिवसैनिकांचा मेळावा संपन्न
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील विराज गार्डन येथे बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) तालुका पदाधिकाऱ्यांच्या वतीने दि. 29 ऑक्टोबर रोजी नुतन पदाधिकारी यांचा सत्कार तसेच कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश व तालुक्यातील शिवसैनिकांचा मेळावा घेण्यात आला.
याविषयी सविस्तर माहीती अशी की, बाळासाहेबांची शिवसेना ( शिंदे गट )लातुर जिल्ह्याचे उपजिल्हाप्रमुख गणेश पांचाळ, अहमदपूर तालुकाप्रमुख गोपीनाथ जायभाये तसेच शहर प्रमुख लक्ष्मण अलगुले यांच्या वतीने अहमदपूर येथील विराज गार्डन येथे दि 29 ऑक्टोबर रोजी नुतन पदाधिकारी यांचा सत्कार कार्यकर्त्यांचा शिवसेनेत पक्ष प्रवेश व शिवसैनिकांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरुढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून बाळासाहेबांची शिवसेना( शिंदे गट ) संपर्कप्रमुख श्रीनिवास क्षिरसागर हे होते तर प्रमुख उपस्थितामध्ये सहसंपर्क प्रमुख ब्रह्माजी केंद्रे जिल्हाप्रमुख गोपाळ माने व प्रमुख पाहुणे म्हणून निलंगा विधानसभा उपजिल्हाप्रमुख सुधीर पाटील उदगीर विधानसभा उपजिल्हाप्रमुख विधानसभा विकास जाधव , अहमदपूर विधानसभा उपजिल्हाप्रमुख गणेश पांचाळ तसेच मनोज चिखले उदगीर तालुकाप्रमुख, रवी शिरुरे चाकूर तालुकाप्रमुख, विकास शिंदे शिरूर अनंतपाळ तालुकाप्रमुख, बाळू जाधव चाकूर शहर प्रमुख, आदी उपस्थित होते.
यावेळी लातूर जिल्हा ग्रामीणचे संपर्कप्रमुख अॅड क्षीरसागर यांनी शिवसैनिकांना संबंधित करते वेळी अहमदपूर तालुक्यातील मागील काळात ज्यांनी शिवसेना संपविण्याच काम केले ते मराठवाडा संपर्क नेत्यांच्या चाटुकार कार्यकर्त्यांनी शहरातील शिवसेनेला विकण्याचे व संपवण्याचे काम केलं आहे, आणि आत्ताच्या शहरातील शिल्लक तथा कथीत वाघ हा तर मराठवाडा संपर्क नेत्यांचा चाटुकार आहेत येणाऱ्या नगरपरिषद मध्ये यांचा बनावटी भुखवटा काढल्याशिवाय शांत बसणार नाही यांनी आतापर्यंत सर्वसामान्य शिवसैनिकांना गुलामा सारखी वागणूक देऊन त्यांचे खच्चीकरण केलं आहे, पुढे ते म्हणाले एकनाथ शिंदे साहेबांचे हात बळकट करण्यासाठी अहमदपूर तालुक्यामध्ये संघटन वाढीसाठी गाव तिथे शाखा घर तिथे शिवसैनिक व शहरांमध्ये गल्ली तेथे शाखा घर तिथे शिवसैनिक ही मोहीम राबवून साहेबांचे संघटनात्मक हात बळकट करावे. आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषदा व पंचायत समिती, ग्रामपंचायत व नगर परिषद निवडणूका ताकतीने लढवून बाळासाहेबांची शिवसेनेचा भगवा फडकवावा अहमदपूर तालुक्यासाठी व शहरासाठी विकास कामासाठी निधी कमी पडू देणार नाही. बाळासाहेबांचे व दिघे साहेबांचे विचारांची शिवसेना जोमाने वाढवावी असे ते यावेळी म्हणाले. यावेळी अहमदपुर शहरातील उपशहरप्रमुख पदाची व किनगाव येथील शहर प्रमुख पदाच्या नियुक्ती करण्यात आल्या यामध्ये राहुल गलाले यांची उपशहरप्रमुख (पश्चिम) पदी, तर मोहन मजरे उपशहरप्रमुख (पुर्व) पदी आणि राजु जाधव यांची उपशहरप्रमुख (पश्चिम) पदी व तय्यब पठाण यांची किनगाव शहर प्रमुख पदी नियुक्ति करण्यात आली.
यावेळी अनेकांनी शहरातील व ग्रामीण भागातील युवा तरुणांनी बाळासाहेबांची शिवसेनाला समर्थन देऊन पक्षात जाहीर प्रवेश केला यावेळी लक्ष्मण गुट्टे विभाग प्रमुख किनगाव, माजी तालुका संघटक सुधाकर जायभाये, अभिषेक भोसले,माधव रोकडे, ॲड.विनोद आर्या, विनोद मुंडे, लक्ष्मण मुंडे, संतोष मुंडे, सुलतान शेख, अमीर पठाण, रहीम तांबोळी, अन्सार तांबोळी, शाहरुख शेख, सोयब शहा, ताज अत्तार, नेहाल शेख, अजर शेख, लायक शेख, तोफिक मोमीन, अमर मोमीन, इरफान तांबोळी, नरसिंग शिंदे आदी शिवसैनिक उपस्थित होते. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी सुनील देशमुख, कपिल नाकसाखरे,प्रवीण डांगे,नरेश चौथईवाले, संगम पाटील, दत्ताभाऊ शिंदे, सतिश जंगले,गणेश मदने,माधव स्वामी, लक्की सिंग बाबरी, सागर सिंग, ऋषभ पाटील, योगेश स्वामी, विजय आंबेकर, सुरज आलापुरे,वैभव चिंचोलकर,रोहित जाधव,ब्रम्हा सारोळे,राहुल गलाले,रोहन जाधव, अविनाश तिडोळे, किरण पवार,अक्षय कदम आदी शिवसैनिकांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी पार पाडला,या मेळाव्याचे सुत्रसंचालन बसवेश्वर थोटे सर यांनी केले.