नागलगाव येथे उपविभागीय पोलीस अधिकारी डॅनियल बेन यांच्या हस्ते भूमीपुत्रांचा सन्मान

नागलगाव येथे उपविभागीय पोलीस अधिकारी डॅनियल बेन यांच्या हस्ते भूमीपुत्रांचा सन्मान

उदगीर (एल.पी.उगीले) : तालुक्यातील नागलगाव येथे “माझं गावं, माझा अभिमान” उपक्रम राबवून नागलगाव येथील अनेक अधिकारी व कर्मचारी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून गावाचा नावं लौकिक केल्याबद्दल, त्याच बरोबर विविध क्षेत्रात सेवा बजावून निवृत्त झाल्याबद्दल सर्व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यात औरंगाबाद वाळूज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप गुरमे, प्रादेशिक राज्य परिवहन सेवा निवृत्त अधिकारी राजाराम कांबळे,प्रा ईश्वर शेरे,हणमंतराव पाटील,त्र्यंबक पाटील,प्राचार्य धोंडीराम तोंडारे, प्राचार्य सूर्यकांत चवळे आदी कर्मचारी व सेवा निवृत्त कर्मचारी यांचा उपविभागीय पोलिस अधिकारी डॅनियल बेन,पोलीस निरीक्षक दिपककुमार वाघमारे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन कलपा पाटील,सरपंच राजीव वाघे,पोलीस पाटील अंकुश वाघे,संग्राम मोरखंडे, माजी चेअरमन गोविंद पाटील,सुभाष राठोड,तंटामुक्ती अध्यक्ष लक्ष्मण चव्हाण,भोटू चव्हाण, सुधीर वाडीकर,अनिल गुरमे,दिलीप राठोड, राजकुमार शेटकार,आदी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!