महात्मा फुले महाविद्यालयात डॉ.श्रद्धा चांदोरीकर यांचा सत्कार

महात्मा फुले महाविद्यालयात डॉ.श्रद्धा चांदोरीकर यांचा सत्कार

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक श्री अरविंद चांदोरीकर यांची सुकन्या डॉ. श्रद्धा हिची एम.बी.बी.एस. नंतर एम.डी. या पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी वर्धा येथे निवड झाली असून, तिच्या या यशाबद्दल तिचा महात्मा फुले महाविद्यालयात प्राचार्य डॉ.वसंत बिरादार पाटील यांच्या शुभहस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी डॉ. श्रद्धा यांचे वडील माजी मुख्याध्यापक श्री. अरविंद चांदोरीकर यांच्यासह महात्मा फुले महाविद्यालयातील मराठी विभागाचे प्रोफेसर डॉ. अनिल मुंडे, डॉ. मारोती कसाब, ग्रंथपाल प्रा. परमेश्वर इंगळे, कार्यालयीन अधीक्षक श्री. प्रशांत डोंगळीकर, अजय मुरमुरे, चंद्रकांत धुमाळे, शिवाजी चोपडे, वामनराव मलकापुरे आदी उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!