आ. बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते २८५ लक्ष रुपयांच्या रस्ते कामाचे भूमिपूजन
अहमदपूर (गोविंद काळे) : तालूक्यातील रामा – २४९ वायगाव – कुमठा – धामणगाव ते रामा २५१ पर्यंत रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग २७ कि.मी. ०/०० ते ३/५०० रस्त्याचे रुंदीकरणसह सुधारणा २८५ लक्ष रुपयांच्या रस्ते कामाचा भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी आमदार बाबासाहेब पाटील यांनी उपस्थित राहून या विकासकामांचा शुभारंभ करत ग्रामस्थांशी संवाद साधला.
यावेळी वायगाव – कुमठा – धामणगाव रस्ते काम भूमिपूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष वायगाव चेअरमन दिनानाथ राचमाळे, तालुकाध्यक्ष शिवाजीराव देशमुख, महेश अर्बन बँक उपाध्यक्ष निवृत्तीराव कांबळे, बाळ भगवान शिक्षण प्रसारक मंडळाचे सह कोषाध्यक्ष बळीरामजी भिंगोले, कोषाध्यक्ष अंकुशराव कानवटे, माजी जिल्हा परिषद सदस्य माधवराव जाधव, बळीरामजी भिंगोले गुरुजी, अंकुशरावजी कानवटे, बाबुराव कवडे, किसान सेल तालुकाध्यक्ष विनायकराव पाटील चोबळीकर, माजी पोलीस निरीक्षक श्रीरामजी निमनवाड, वायगाव सरपंच ज्ञानेश्वर पाटील, सय्यदपुर माजी सरपंच गंगाधरराव ताडमे, श्रीकांत मजगे पंकज राचमाळे, वामनराव पाटील, गादेवाडी सरपंच दीनानाथ एतलवाड , उपअभियंता हत्ते साहेब, अभियंता सगर, चेअरमन रावसाहेब भोसले, उपाध्यक्ष बाळासाहेब बेडदे, बोडखा चेअरमन धनाजी कानवटे, बाबुराव बोडके, नारायण पवार, परमेश्वर तीरकमटे, सुधीर भोसले, भगवान बच्चेवार, मुकुंदराव पाटील, मोमले लाईनमन आदी मान्यवर उपस्थित होते.