आ. बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते ३३ लक्ष रुपयांच्या विविध विकासकामांचा शुभारंभ !

आ. बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते ३३ लक्ष रुपयांच्या विविध विकासकामांचा शुभारंभ !

अहमदपूर (गोविंद काळे) : मौजे गादेवाडी व द्वारकानगर येथील ३३ लक्ष रुपयांच्या विविध विकासकामांचा शुभारंभ सोहळा आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपस्थित राहून या विकासकामांचा शुभारंभ करत आमदार यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला.

गादेवाडी व द्वारकानगर येथील विकासकामांमध्ये जन सुविधा योजनेअंतर्गत सिमेंट काँक्रीट रस्ता १० लक्ष रुपये, तांडा वस्ती अंतर्गत द्वारकानगर येथे सिमेंट रस्ता ५ लक्ष रुपये, द्वारकानगर ते पाण्याची टाकी व अंतर्गत पाईपलाईन १८ लक्ष रुपये अशा एकूण ३३ लाख रुपयांच्या विकासकामांचा समावेश आहे.

अहमदपूर चाकूर मतदारसंघात होत असलेली विकासकामे व कामांची गती पाहून जनतेकडून समाधानाचे सुर उमटत आहेत. आपल्या माध्यमातून अनेक विविध विकासकामे हाती घेतली जात असून ती पूर्णत्वास नेली जात आहेत. मुख्यत्वे पायाभूत सुविधांवर भर देत मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साधला जात आहे. विविध समाज विधायक विकासकामांमुळे मतदारसंघातील जनता समाधानी आहे. जनसेवा हेच आद्यकर्तव्य असून यासाठी आपण सदैव कटीबद्ध आहोत, असे मत यावेळी आमदार बाबासाहेब पाटील यांनी व्यक्त केले.

गादेवाडी व द्वारकानगर येथे कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी पोलीस निरीक्षक श्रीरंग मारोतीराव निमणवाड, गादेवाडी सरपंच दीनानाथ ऐतलवाड, दिगंबर एसमोड, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष शिवाजीराव देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य निवृत्तीराव कांबळे, माजी जिल्हा परिषद सदस्य माधवराव जाधव, चेअरमन दिनानाथ राचमाळे, बोडके बाबुराव, चेअरमन रावसाहेब भोसले, मुकुंदराव पाटील, श्रीकांतजी मजगे, परमेश्वर तिरकमटे, उपअभियंता हत्ते साहेब, अभियंता सगर, गंगाधरराव ताडमे, बाळासाहेब बेडदे, चेअरमन नारायण पवार, उपसरपंच गफुरसाब शेख, तंटामुक्ती अध्यक्ष वामनराव पाटील, संतराम केनलवाड, मष्णाजी एसमोड, वाहेद शेख, माजी सरपंच सिरहोनर निमलवाड, ग्रामपंचायत सदस्य खंडेश्वर राघमोड, गिरीशकुमार यसनाडे, ज्ञानोबा राघमोड, भोलेश्वर निमलवाड, दिगंबर पाटील, विजयकुमार ऐतलवाड, माजी सैनिक अधिकारी पांडुरंग राजमोडे, भगवान बचेवार, सुधीर भोसले, दोडका चेअरमन धनाजी कानवटे, शिवप्रताप बोडके आदी मान्यवर उपस्थित होते.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!