दयानंद शिक्षण संस्था सभागृहात जागतिक रंगभूमी दिन साजरा
लातूर (प्रतिनिधी) : दि.०५ नोंव्हेंबर २०२२ रोजी दयानंद शिक्षण संस्था सभागृहात ‘जागतिक मराठी रंगभूमी दिन’ साजरा करण्यात आला. याप्रसंगी दयानंद कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शिवाजी गायकवाड यांच्या हस्ते नटराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात व सभागृहाला पुष्पहार अर्पण करून जागतिक मराठी रंगभूमी दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी दयानंद कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शिवाजी गायकवाड, बालाजी सुळ, सोनू भैय्या डगवाले, दयानंद सभागृह व्यवस्थापक गिरी, मयूर राजापुरे प्रा. सोमनाथ पवार, प्रा. विश्वजीत पांचाळ, प्रा.महेश जंगापल्ले, प्रा. विशाल लामतुरे, सुनील वेरेकर, गोविंद कांबळे, स्नेहा शिंदे, सचिन झेटे, तनुजा शिंदे, विजय घोलपे, सिताराम खोडवेकर, नितीन पुट्टेवाड, सुरज साबळे, स्वामी अमोल तसेच दयानंद कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील सर्व कलावंत उपस्थित होते.
