पालकमंत्री गिरीश महाजन यांचे अहमदपूरात जंगी स्वागत

पालकमंत्री गिरीश महाजन यांचे अहमदपूरात जंगी स्वागत

अहमदपूर (गोविंद काळे) :महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे नुतन पालकमंत्री गिरीशजी महाजन यांचे अहमदपूर मध्ये जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री विनायकराव पाटील यांच्या पुढाकाराने पालकमंत्री गिरीश महाजन यांचे क्रेन च्या साह्याने मोठा पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले. सदरील सोहळ्यात भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री विनायकराव पाटील,भाजपाचे प्रदेश प्रवक्ते गणेश दादा हाके, माजी आमदार बब्रुवान खंदाडे,किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस दिलीपराव देशमुख, राजकुमार मजगे, अँड.भारत चामे,भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंदराव गिरी, माजी उपसभापती निळकंठ पाटील, राजकुमार खंदाडे, अँड.अमित रेड्डी, सुधीर गोरटे ,रामभाऊ नरवटे, अँड. किशोर कोरे, अँड. निखिल कासनाळे ,डॉ.सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी, नाना कदम, भाजपचे तालुकाध्यक्ष हणमंत देवकते, रामभाऊ बेल्लाळे, बालाजी मुंडे,श्रीकांत भुतडा, ज्ञानोबा बडगिरे, चंद्रशेखर डांगे, गणेश हालसे, संतोष कोटलवार आधी सह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालकमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच गिरीश महाजन यांचा अहमदपूर दौरा असल्याने अहमदपूर मध्ये मोठ्या उत्साहात ढोल ताशाच्या गजरात फटाक्यांची आतिषबाजी करत रात्री 11 वाजता त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. अहमदपूर शहरातील बसवेश्वर चौक येथून पालकमंत्री गिरीश महाजन यांची सजवलेल्या रथातून मिरवणूक कढण्यात आली तद नंतर अहमदपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर भाजपाचे प्रदेश प्रवक्ते गणेश दादा हाके यांच्या निवासस्थानी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी विवीध संघटनेचे, पदाधिकाऱ्यांचे निवेदन पालकमंत्री गिरीश महाजन यांनी स्वीकारली.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!