घरफोडीतील आरोपींकडून 3 लाख 12 हजार व पाच मोबाईल असा एकूण 3 लाख 65 हजार रुपयाचा मुद्देमाला जप्त

घरफोडीतील आरोपींकडून 3 लाख 12 हजार व पाच मोबाईल असा एकूण 3 लाख 65 हजार रुपयाचा मुद्देमाला जप्त

लातूर (एल.पी.उगीले) : चोऱ्या घरफोड्या चे प्रमाण वाढल्याचे लक्षात येतात. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या संदर्भात जिल्ह्यातील सर्वच पोलीस स्टेशनला चौकशीचे आदेश दिले होते. वरिष्ठांच्या आदेशानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपीस अटक करून त्याच्याकडून चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी तीन लाख बारा हजार रुपयांचा एवजांनी पाच मोबाईल जप्त केले आहेत.
याबाबत थोडक्यात हकीकत अशी की, दिनांक 24/10/2022 रोजी पोलीस ठाणे विवेकानंद हद्दीतील आयोध्या कॉलनी येथील एका घरात अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून घरात कोणीही नसल्याचा फायदा घेऊन कपाटात ठेवलेली रोख रक्कम 3 लाख 75 हजार रुपये चोरून नेले.अशा तक्रारीवरून पोलीस स्टेशन विवेकानंद चौक येथे गुरनं 598/2022 कलम 454, 457,380 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचा आढावा घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याच्या उद्देशाने पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी निर्देशित करून महत्त्वाच्या सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक अनुराग जैन,उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर जितेंद्र जगदाळे यांनी पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांचे नेतृत्वात पोलीस पथक नेमुन तपासा बाबत सूचना व मार्गदर्शन केले होते.
तपासा दरम्यान पोलीस पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावरून मोठ्या शिताफीने आरोपी नामे
अक्षय राम तेलंगे ( वय 22 वर्ष राहणार गोपाळ नगर, लातूर ), योगेश उर्फ शक्ती अशोक गुरणे(, वय 25 वर्ष, राहणार माताजी नगर, लातूर) या दोन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांचेकडे गुन्ह्या बाबत विचारपूस केले असता, आरोपींनी गुन्हा केल्याची कबुल केले. गुन्ह्यात चोरलेली रोख रक्कम 3 लाख 12 हजार रुपये व चोरी केलेल्या रक्कमेतून खरेदी केलेला 13,500 रू. चा मोबाईल तसेच इतर ठिकाणाहून चोरी केलेले अंदाजे 40 हजार रुपये किमतीचे चार मोबाईल आरोपींच्या कबुली वरून गुन्हयात जप्त करण्यात आले आहेत. गुन्ह्यातील उर्वरित मुद्देमाल हस्तगत करण्याची प्रक्रिया सुरू असून सध्या दोन्ही आरोपी 8 तारखेपर्यंत पोलीस कोठडी मध्ये आहेत.
गुन्ह्याचा तपास पोलीस ठाणे विवेकानंद चौक येथील सपोनि भाऊसाहेब खंदारे हे करीत आहेत.
सदर गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोलीस निरीक्षक बावकर व त्यांच्या टीम मधील सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब खंदारे, पोलीस उपनिरीक्षक महेश गळगटे, पोलीस अमलदार रामचंद्र ढगे, संजय कांबळे, महेश पारडे, अभिमन्यू सोनटक्के,विनोद चलवाड, दयानंद सारुळे , रमेश नामदास , खंडू कलकत्ते , वाजिद चिकले, दीपक बोंदर, तुकाराम भोसले, नारायण शिंदे मुन्ना नलवाड, सायबर सेलचे संतोष देवडे, गणेश साठे यांनी घरफोडीच्या गुन्ह्याचा जलद गतीने व कौशल्यपूर्ण तपास करून गुन्ह्याची उकल करून गुन्हा उघडकीस आणून, गुन्ह्यात चोरलेला मुद्देमाल हस्तगत करण्याची कामगिरी बजावली आहे.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!