शिक्षकाचा दिपावळीत पगार न केल्यामुळे शासनाचा आनोख्या पध्दतीने निषेध
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती निलंगा शाखांने १ ₹ मनीऑर्डर शासनाला केली.
निलंगा (प्रतिनिधी) : शिक्षकाच्या पगारी दिवाळी पुर्वी करावी असा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाने काढला दिवाळी होवुन सुधा अजुन पगारी झाल्या नाहीत त्या मुळे शासनाचा व प्रशासनाचा निषेध करण्यासाठी नविन अभिनव निषेध शिक्षक समिती निलंगाने केला असुन 1 रु महाराष्ट्र शासनास मनिआँर्डर करण्यात आली आहे.महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यातील सर्व तालुका शाखांनी १ ₹ मनीऑर्डर शासनाला देऊन दि 10 नोव्हेंबर रोजी काळी फित लावून निषेध आंदोलन करावे असे राज्य शाखेकडुन आदेश आसल्यामुळे शिक्षक समितीने 1 रु मनिआर्डर करुन शासनाचा निषेध दर्शविला आहे त्याप्रसंगी अरुण सोळुंके, तालुकाध्यक्ष संजय कदम, गमेश गायकवाड, गिरी एम बी,धनाजी आर बी, विष्मुकांत धुमाळ तालुका शाखा व जिल्हासरचिटमीस संजय सुर्यवंशी होते. त्याप्रसंगी लातुर जि प शिक्षण विभागातील काम हे उदासीन असुन सिक्षकाच्या प्रत्येक कामाला वेळकाढू धोरण दिसुन येते जिल्हात प्रत्येक शाळेला गणवेश घेण्यासाठी रक्कम दिली पण जिल्हातील 16 शाळेला गणवेशाची रक्कम दिली नाही त्याचा पाठपुरावा केला तरी प्रशासन हात वर करीत आहे. शिक्षण विभागात सावळा गोंधल चालु असुन पाच महिन्यापासुन मु अ पदोन्नत्तीच्या याद्याच करणे चालु आहे.शिक्षक समितीने या ही बाबीचा निषेध करुन लवकरच लातुर जि प वर आंदोलन उभे करणार असे ठरले. राज्यातील प्राथमिक शिक्षकांचे ऑक्टोबर २०२२च्या वेतन विलंबाबाबत शालेय शिक्षण विभागाचा निषेध करण्यासाठी राज्य शाखेच्या वतीने पुकारलेल्या अनोख्या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला
शिक्षक समितीच्या तमाम सर्व शिक्षक बांधवांनी राज्य शाखेच्या आदेशानुसार दि. 10 नोव्हेंबर २०२२ रोजी काळ्या फिती लावून कामकाज करावयाचे आहे. जिल्हयांमध्ये ऑक्टोबरचे वेतन झालेले नाही तसेच ७ व्या वेतन आयोगातील २ व ३ रा हप्ता दिलेला नाही या विरोधात शिक्षक समिती राज्य शाखेने दि. 10 नोव्हेंबर २०२२ रोजी राज्यस्तरीय काळ्या फित लावून निषेध आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनात शिक्षक समिती सर्व शाखा सक्रीय सहभागी असून तालुका तालुका निलंगा शाखा हे आंदोलन यशस्वी करणार आहेत. शाळानिहाय काळी फित लावून निषेध आंदोलनात सहभागी व्हावे असे सांगितले.