राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने अब्दुल सत्तार यांच्या विरोधात आंदोलन

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने अब्दुल सत्तार यांच्या विरोधात आंदोलन

उदगीर (एल.पी.उगीले) : सरकारचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी संसदरत्न खा. सुप्रियाताई सुळे यांच्या बद्दल केलेल्या वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

सत्तेची हवा डोक्यात गेलेले हे सरकार आणि त्यांचे मंत्री मुजोरपणाने वागत आहेत, हा अवघा महाराष्ट्र बघतोय. अब्दुल सत्तारांनी खासदार सुप्रियाताई यांच्या बद्दल जे वक्तव्य केलं ते अतिशय खालच्या स्तराचे असून अब्दुल सत्तारनी जाहीर माफी मागून राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने केली आहे.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रा.शिवाजीराव मुळे , शहर अध्यक्ष समीर भाई शेख, शहर कार्याध्यक्ष गजानन सताळकर, सेवा दलाचे प्रदेश उपाध्यक्ष नवनाथ भाऊ गायकवाड,माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर पाटील, जिल्हा उपाध्यक्ष सुनील केंद्रे, माजी शहराध्यक्ष समद भाई शेख, जेष्ठ नेते धनाप्पा बनसोडे,युवा नेते सय्यद जानी भाई शेख, युवक तालुका अध्यक्ष रोहीदास कोंडगिर, युवक शहराध्यक्ष अजय शेटकार, महीला तालुका अध्यक्ष उर्मिलाताई वाघमारे, डॉक्टर सेल तालुका अध्यक्ष भाग्यश्रीताई घाळे, महीला शहराध्यक्ष दिपालीताई औटे, युवती शहराध्यक्षा जोतिताई स्वामी, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे युवराज कांडगिरे , माजी नगरसेवक अनिल भाऊ मुदाळे, माजी नगरसेवक फय्याज भाई शेख,माजी नगरसेवक ईमरोज हाश्मी,माजी नगरसेवक नाना शेख तसेच सर्व सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!