रणरागिनी जया काबरा “सावित्रीच्या लेकी” पुरस्काराने सन्मानित

रणरागिनी जया काबरा "सावित्रीच्या लेकी" पुरस्काराने सन्मानित

उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर येथील समाजसेविका तथा कोरोणा योद्धा म्हणून सर्व परिचित असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्ष जया काबरा यांना नवी दिल्ली येथील लोकशाहीर जनकल्याण सेवा समितीच्या वतीने दिला जाणारा, अत्यंत सन्मानाचा “सावित्रीच्या लेकी” हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

देशभरामध्ये शैक्षणिक क्षेत्रात, कलाक्षेत्रात, क्रीडा, संस्कृतिक, सामाजिक, राजकीय, प्रशासकीय क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करून आपल्या कामाचा ठसा समाज मनावर उमटवणाऱ्या कर्तबगार महिलांसाठी हा पुरस्कार दिला जातो. उदगीर येथील सामाजिक कार्यकर्त्या तथा कोरोना काळामध्ये सामाजिक जाणीवा जपत लॉकडाऊन च्या काळात गोरगरिबांना अन्नधान्याचे कीट वाटप करणे असेल किंवा ज्या गरिबांच्या चुली बंद आहेत, त्या गरिबांना अन्नधान्य पुरवण्याचे प्रयत्न असतील. हे जया काबरा यांनी पुढाकार घेऊन केले आहेत. त्यांच्या या सामाजिक कार्याची जाणीव ठेवून नवी दिल्ली येथील लोकशाहीर जनकल्याण सेवा समिती यांच्या वतीने अत्यंत सन्मानाचा हा पुरस्कार जाहीर केला आहे.

सदरील पुरस्कार शिक्षण क्षेत्रातील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने 3 जानेवारी 2023 रोजी नवी दिल्ली येथे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात येणार असल्याचे संयोजन समितीच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.

येथील सामाजिक कार्यकर्त्या जया काबरा यांच्या कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार दिल्याबद्दल जिल्हाध्यक्ष रेखाताई हाके, प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ, प्रदेश सोशल मीडिया प्रमुख नयनाताई वासवानी, माजी प्रदेशाध्यक्ष उमाताई खापरे, प्रदेश सदस्य उत्तराताई कलबुर्गे, प्रदेश चिटणीस मीनाक्षीताई पाटील, प्रदेश सदस्य सरोजा वारकरे, प्रदेश सदस्य कोमल कलशेट्टे, महिला मोर्चा सरचिटणीस मंदाकिनी ताई जीवने, महिला मोर्चा उपाध्यक्ष बबीता पांढरे, अनिता बिरादार, शिवकर्णा अंधारे, ललिता कांबळे, श्यामला कारामुंगे, अन्नपूर्णा फड, माने मॅडम, वर्षाताई, शीलाताई, यांच्यासह उदगीर शहर आणि परिसरातील तसेच सीमावर्ती भागातील जनतेतून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

About The Author