शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांना जामीन मिळताच उदगीरात जल्लोष

शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांना जामीन मिळताच उदगीरात जल्लोष

उदगीर( एल.पी.उगीले) : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांना मुंबई येथील पत्राचाल घोटाळा प्रकरणी संशयित आरोपी म्हणून अटक करण्यात आले होते. मात्र न्यायालयाने सदरील अटक ही चुकीची असल्याचे सांगत त्यांचा जामीन अर्ज मंजूर केला आहे. ही बातमी उदगीर शहरात पोहोचतात तालुक्यातील सर्व शिवसैनिकांनी एकच जल्लोष साजरा केला.

छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेनेचे तालुकाप्रमुख कैलास पाटील, शिवसेनेचे उदगीर विधानसभा प्रमुख श्रीमंत दादा सोनाळे, तालुका संघटक बालाजी अण्णा पुरी, शहर प्रमुख मुन्ना पांचाळ, युवा सेना जिल्हा समन्वयक शैलेश वडगावे, शहर संघटक संजय मठपती, व्यंकट अण्णा साबणे, बन्सीलाल अण्णा कांबळे, विधिज्ञ विष्णुकांत चिंतलवार, शरद भैय्या सावरे ,जमीरुद्दीन मलंग, रोहित बोईनवाड, शेख ईदरीस, शेख सलमान, अन्सारी झेन इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत फटाके फोडून आणि मिठाईवाटून आनंद उत्सव साजरा केला.

शिवसेनेची मुलुख मैदानी तोफ आता बाहेर आली आहे. उद्धव ठाकरे साहेब एकटे आहेत पाहून त्यांच्या विरोधात कटकारस्थान करणाऱ्यांना आता त्यांची जागा दाखवली जाईल. असा विश्वासही याप्रसंगी शिवसेनेचे तालुकाप्रमुख कैलास पाटील यांनी बोलून दाखवला. सर्व शिवसैनिकाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. उत्स्फूर्तपणे घोषणा दिल्या जात होत्या. संपूर्ण शहरात चौका चौकात फटाके फोडण्यात आले. दिवाळीनंतर ही दुसरी दिवाळी शिवसैनिकांच्या वतीने साजरी करण्यात आली.

About The Author