मुजीबभाई हाशमी यांची टायगर सेनेच्या मराठवाडा अध्यक्षपदी निवड
उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर येथील सामाजिक कार्यकर्ते मुजीबभाई हाशमी यांची टायगर सेनेच्या अल्पसंख्याक टायगर सेनेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. ही निवड टायगर सेनेचे संस्थापक अध्यक्ष जॉकी सांवत यांनी केली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून उदगीर तालुक्यात सामाजिक, धार्मिक व राजकिय क्षेत्रात काम करणारे मुजीबभाई हाशमी ते कायम आपल्या चांगल्या कामामुळे ओळखले जातात. कोरोना काळात हजारो गोरगरीब व गरजू लोकांना अन्नधान्याचे किट वाटप केले. दुष्काळात पाणीटंचाई मुळे त्रास्त असलेल्या नागरिकांना पाणी उपलब्ध करून दिले. त्यांचे कार्य कायम जनतेच्या उपयोगी पडणारे असुन मुजीबभाई हाशमी मित्रमंडळच्या माध्यमातून गरजूंना मदतीचा हात दिला जातो.
हाशमी यांच्या कामाची दखल घेवून टायगर सेनेचे संस्थापक अध्यक्ष जॉकीदादा सांवत यांनी त्यांची नियुक्ती अल्पसंख्याक मराठवाडा अध्यक्षपदी केली आहे. या निवडीचे स्वगत मोठ्याप्रमाणात होत आहे.