ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी यंत्राद्वारे ऊस तोडणी करावी – विवेक जाधव

ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी यंत्राद्वारे ऊस तोडणी करावी - विवेक जाधव

उदगीर (एल. पी. उगीले) : ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ऊस तोडणी साठी कंत्राटदाराच्या मागे फिरण्यापेक्षा किंवा मुकादमाच्या मागे फिरण्यापेक्षा ऊस तोडणी यंत्राच्या साह्याने ऊस तोडणी करणे जास्त फायद्याचे ठरणार आहे. असे विचार विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी गंगापूर, भाकसखेडाचे चेअरमन विवेक पंडितराव जाधव यांनी व्यक्त केले आहे.

यंत्राद्वारे ऊस तोडणी करण्याचे विविध फायदे त्यांनी यावेळी स्पष्ट केलेआहेत. ज्यामध्ये प्रामुख्याने सध्या शेती व्यवसायाला गतिमान करण्यासाठी यांत्रिकीकरण ही काळाची गरज बनलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची सुशिक्षित मुले देखील शेती व्यवसायाकडे वळू शकतात. ऊस लागवडी पासून ते तोडणीपर्यंत सर्व कामे यंत्राने होऊ लागल्याने कमी खर्चात अधिक उत्पादन मिळणे शक्य झाले आहे. शेतकऱ्यांची सुशिक्षीत मुले अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करू लागल्यामुळे स्वतःचे ऊस तोडणी यंत्र घेऊन शेतीसाठी आवश्यक असणारा जोडधंदा म्हणूनही काम करू शकतात. आणि उत्पादन मिळवू शकतात. तसेच इतर वेळा ऊस तोडणी साठी मजुरांच्या टोळ्या शोधत फिरणे, मुकादमाच्या चकल्या मारणे अशा प्रकारामुळे कित्येक वेळेस शेतकरी आणि कारखाना दोन्हींची मोठी गोची झालेली आहे. ती होणे बंद होईल, शेतकऱ्याच्या मुलाला चार पैसे मिळू लागतील.

साधारणतः एका ऊस तोडणी यंत्राबरोबर तीस ते चाळीस युवकांना रोजगार मिळू शकतो. या यंत्राच्या वापरामुळे शेतकऱ्यांचा ऊस वेळेत कारखान्याला जातो. शिवाय व्यवस्थित तोडणी झाल्यामुळे टनेजही वाढते, ऊस तोडणी यंत्राने ऊस तोडल्यामुळे पाचट कुट्टी होऊन सेंद्रिय खताची निर्मिती होते. हा अधिकचा फायदा शेतकऱ्यांना होत असतो. ऊस तोडणी यंत्र वापरल्यास ऊस पुरवठा अभावि कारखाने नोकेन होणार नाहीत. तसेच ऊस तोडणी यंत्रामुळे शेतकरी, शेतकऱ्यांची मुले आणि साखर कारखाने ही चांगलेच फायद्यात राहणार आहेत.

एकंदरीत शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून ऊस तोडणी यंत्रासाठी कर्ज पुरवठा करण्याचे अत्यंत चांगले धोरण स्वीकारले आहे.

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन तथा युवकांचे हृदय सम्राट आ. धीरजभैय्या विलासराव देशमुख यांच्या या निर्णयांचे सर्वत्र स्वागत केले जात असल्याचेही या प्रसंगी विवेक पंडितराव जाधव यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी बँक असून सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल होत असल्यामुळे आणि सर्व संचालक मंडळ लोक कल्याणकारी योजना राबवत असल्यामुळे राज्यातील नामांकित बँक म्हणून या बँकेचा बोलबाला झालेला आहे. तरुण चेअरमन भेटल्यामुळे तरुणांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते सतत अग्रेसिव असल्याचेही विवेक जाधव यांनी सांगितले.

About The Author