लालबहादुर शास्त्री प्राथमिक शाळेत बिरसा मुंडा जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न

लालबहादुर शास्त्री प्राथमिक शाळेत बिरसा मुंडा जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न

उदगीर (एल.पी.उगीले) : येथील भारतीय शिक्षण प्रसारक संस्था,अंबाजोगाई संचलित लालबहादुर शास्त्री प्राथमिक शाळेत भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील आदिवासी समाजातील आद्य क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम घेण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे तर, प्रमुख पाहुणे म्हणून माधव केंद्रे व विभाग प्रमुख सुधाकर पोलावार उपस्थित होते. मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले.

प्रमुख पाहुणे माधव केंद्रे यांनी क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या कार्याविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती सांगितली. संपूर्ण भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीत होता, सर्वत्र अत्याचार, अन्याय होत होते. सर्वत्र इंग्रजा विरुद्ध असंतोष पसरला होता.त्यामुळे एका पाड्यावरच्या आदिवासी समाजातील बिरसा मुंडा या तरुणाने इंग्रजांविरुद्ध उलगुलान पुकारले. आदिवासी समाज बिरसा मुंडा यांना भगवान मानत. असे मार्गदर्शन केले.

अध्यक्षीय समारोपपर भाषणात मुख्याध्यापक अंकुश निरगुडे यांनी आदिवासी समाजातील क्रांतिकारक होते. इंग्रजा विरुद्ध सर्व जनता पेटून उठली होती, त्यात आदिवासी समाजही सहभागी होता. आपणही बिरसा मुंडासारखे भविष्यात देश सेवेसाठी सदैव तत्पर असले पाहिजे.असे सांगितले. व बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केले. सूत्रसंचालन सौ भाग्यश्री स्वामी यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकांनी सहकार्य केले.

About The Author