बालाघाट तंत्रनिकेतन मध्ये डॉ. पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती साजरी
अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील बालाघाट तंत्रनिकेतन व औद्योगिक प्रशिक्षण संस्थे मध्ये देशाचे पहिले पंतप्रधान डॉ पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आली यावेळी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य मदन आरदवाड यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांनी प्रतिमेस अभिवादन केले. यावेळी कालिदास पिटाळे, सिद्राम मासुळे ,गणेश यमगीर, संतोष कचवे, सय्यद, गीते, लोहकरे,मंगेश चव्हाण, शेळके, सतीश केंद्रे, विजय पांचाळ आदी उपस्थित होते.
