विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी रुद्धा-गंगाहिप्परगा- बेंबडेवाडी मध्ये स्वीकृत सदस्यांची निवड

विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी रुद्धा-गंगाहिप्परगा- बेंबडेवाडी मध्ये स्वीकृत सदस्यांची निवड

अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी रुद्धा-गंगाहिप्परगा- बेंबडेवाडी येथे आज मासिक सभा चेअरमन सुभाष कदम यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. यामध्ये स्वीकृत सदस्य पदी मधुकर नागरगोजे, नामदेव कडवदे, माधव मोरेवड यांची सर्व संचालक मंडळाच्या वतीने निवड करण्यात आली. या निवडीबद्दल मा सरपंच नाथराव केंद्रे, व्हाईस चेअरमन खोबराजी केंद्रे, मा व्हॉइस चेअरमन दत्ता सुरणर, संचालक आशाताई केंद्रे,संचालक दादाराव होळंबे,ग्रा.प.सदस्य सुरेश चाटे, व्यंकटी सुरणर, तसेच राजेंद्र केंद्रे, बालाजी केंद्रे, कालिदास साबळे, अच्युत शिंदे व गावातील सर्व नागरिकांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

About The Author

error: Content is protected !!