अहमदपूर तालुक्यातील नागझरीचे भुमिपुत्र मंचक इप्पर यांची डी.आय.जी पदी पदोन्नती
अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील बालाघाटच्या ओसाड माळरानावरील पट्यात वसलेल्या छोट्याश्या गावातील तिर्थ क्षेत्र नागझरी येथील मातीत जन्मलेले भुमिपुत्र मंचक इप्पर आय.पि.एस (IPS) यांची नुकतीच मोठ्या पदावर डी.आय.जी पदी नियुक्ती झाली असल्यामुळे भारतात अहमदपूर तालुक्याची मान अभिमानाने उंचावली आहे.
तालुक्यातील दुर्गम अश्या बालाघाटच्या माळरानावर वसलेल्या छोट्याश्या गावातील नागझरी येथील भुमिपुत्र आय.पि.एस. मंचक इप्पर यांनी आज उत्तुंग भरारी घेतली आले ते इ.सन 2008 बॅचचे आय.पी.एस अधिकारी आहेत त्यांना प्रथम त्रिपुरा या राज्यात (केडर) सेवा करण्याची संधी भेटली त्यांनी जवळपास 10 वर्ष त्रिपुरा राज्यामध्ये आपल्या कामाचा ठसा उमटवला बांगलादेश बॉर्डरची तस्करी असेल ते कडक कायदा व सुव्यवस्था अंमलबजावणी साठी नामांकित होते त्रिपुरातील अवैद्य दारू, मटका, आतंकवादी यांच्यावर कडक कार्यवाह्या करून त्यांनी आपल्या कामातून एक वेगळाच ठसा उमटवला त्यामुळेच त्यांना त्रिपुरा राज्यातील तत्कालीन मुख्यमंत्री मानिक सरकार व राज्याचे पोलीस महासंचालक के नागराजन यांनी उत्कृष्ठ अधिकारी म्हणून दोन वेळा पुरस्कार देऊन गौरव केला.
2019 मध्ये त्यांना होम पोस्टिंग म्हणून महाराष्ट्र मध्ये आले. त्यांना हिंगोली येथे नियुक्ती करण्यात आली त्यांनी एस.आर.पी.एफ हिंगोली येथे कमांडंट या पदावर दीड वर्ष सेवा केली व आपल्या कामाची चुणुक दाखवुन हिंगोली गटाला राज्यात प्रथम पारितोषिक मिळवुन दिल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांना पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. त्यानंतर त्यांची नियुक्ती अतिशय सेन्सिटिव्ह झोन म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवड येथे पोलीस उपायुक्त म्हणून करण्यात आली दोन वर्ष अतिशय उत्कृष्ट कामगिरी त्यांनी पार पाडली.
आता ते नाशिक येथे गुन्हे अन्वेषण विभाग नाशिक पोलीस अधीक्षक म्हणून कार्यभार पाहत आहेत. मंचक इप्पर साहेबांच्या काही यु.एस.पी आहेत.
एक तर ते ग्रामीण भागातुन आले होते, एक कला शाखेचा विद्यार्थी कष्ट, अनुशासन या जोरावर आय.पि.एस (IPS) होतो हे एक दुर्मिळ उदाहरण आहे त्यात त्यांनी पुढे आर्टस शाखेतून ग्रँजुऐशन केले, आर्ट्सच्या विद्यार्थ्यांना यु.पि.एस.सी (UPSC ) ची तयारी करण्यासाठी ते प्रेरणादायी ठरले आहेत त्यांच्या यशामुळे गरीब, ग्रामीण, शेतकरी कुटुंबातील मुलांचे ते प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या यशाने मुंबई विद्यापीठाची शैक्षणिक गुणवत्ता,कँम्पस मधील शैक्षणिक वातावरण व एक नापास विद्यार्थ्यांचा यशस्वी नागरिक बनविनयाची काबलीयत अधोरेखीत झाली आहे.
आणखी एक यु.पि.एस फार दुर्मिळ आहे
आमच्याच डोंगराळ तालुक्यातील जे विद्यार्थी साधे तलाठी, ग्रामसेवक, कारकून, तहसीलदार झाले आहेत, ते तालुक्यातील नागरिकांची ओळख विसरतात, पण आय.पि.एस (IPS)असूनही मंचकराव इप्पर साहेबांना सामान्यातील सामन्य माणूस अर्ध्यारात्री कॉल करू शकतो, सतत मदतीचा हात पुढे करण्याची मानसिकता, कोणासाठी कश्यासाठी ही स्वतःचे योगदान देण्याची तयारी, त्यामुळे अबाल, वृध्द त्यांना हक्काने फोन करतात, अहमदपूर तालुक्यातील जेष्ठ नागरिकांच्या मोबाईल मध्ये त्यांचा नंबर सेव्ह असतो,छोट्या मोठ्या प्रशासकीय कामासाठी कर्मचाऱ्यांकडे गेल्यावर ते आधिकार वाणीने साहेबांची ओळख सांगतात, साहेबांना फोन लावू का ?असा दम भरतात, असा जमिनिशी जुडलेला आय.पि.एस (IPS) मिळणे दुर्मिळच कुठे जरी असले तरी आपल्या गावाकडील, भागातील सर्वानाच मानाने बोलणार अधिकारी म्हणून ओळख असणारे अधिकारी आहेत नुकतीच भारत सरकारने त्यांना डि.आय. जी म्हणून पदोन्नती दिली आहे. या त्यांच्या निवडी बद्दल लातुर जिल्ह्याचे खासदार सुधाकर श्रृंगारे अहमदपूर -चाकुर मतदार संघाचे आमदार बाबासाहेब पाटील, माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव, माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील, माजी आमदार बाब्रुवान खंदाडे, गणेश दादा हाके (भाजपा महाराष्ट्र राज्य प्रवक्ते), सर्व राजकीय, व्यावसायिक, मित्र परिवार व तसेच तालुक्यातील सर्व स्तरावरून कौतुक केले जात आहे.