जेष्ठ नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन
रूक्मीणबाई संग्राम सोमवंशी यांच्या पुण्यतिथी निमित्त सामाजिक आरोग्यदायी उपक्रम
उदगीर (एल.पी.उगीले) : समाजाचे काही देनं लागतो हि जबाबदारी कायम पार पाडली पाहिजे हि शिकवन देणा-या डॉ दिपक सोमवंशी यांच्या माता रूक्मीणबाई संग्राम सोमवंशी यांच्या तिसऱ्या पुण्यतिथी निमित्ताने जेष्ठ नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
सदर मोफत नेत्र शिबीर “अंधारातून प्रकाशाकडे” या चळवळीतून ओळख निर्माण करणा-या महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध नेत्र तज्ञ डॉ ज्योती दिपक सोमवंशी यांच्या दिपज्योती डोळ्यांचा दवाखाना नाईक चौक निडेबन रोड उदगीर येथे शुक्रवारी दिनांक २५-११-२०२२ रोजी सकाळी १०.३० ते सायंकाळी ५ पर्यंत चालणार आसून तदनंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी दिनांक २६-११-२०२२ रोजी अत्यंत अल्प दरात शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
अंधत्वाचे महत्त्वाचे एक कारण म्हणजे मोतीबिंदू वरील शस्त्रक्रिया हाच एकमेव पर्याय आसून आंधत्व टाळण्यासाठी मोतीबिंदू रूग्णांनी नेत्र तपासणी व औपरेशन करणे अत्यंत आवश्यक आहे. या शिबिरात सहभागी होण्यासाठी पूर्व नोंदणी आवश्यक आसून ८४०८८८६३८९/९४२२४९३७८४ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.
तरी सर्व गरिब व गरजू जेष्ठ नागरिकांनी या आरोग्यदायी मोफत नेत्र तपासणी शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन डॉ दिपक सोमवंशी व डॉ ज्योती सोमवंशी यांनी केले आहे.