माध्यमिक शाळा दापका शालेय व्यवस्थापन समितीची बैठक संपन्न
कमालनगर (एल.पी.उगीले) : तालुक्यातील दापका येथील माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक भानुदास वासरे यांच्या अध्यक्षतेखाली व शालेय सुधार समितीचे अध्यक्ष अंकुश लक्ष्मणराव वाडीकर यांच्या उपस्थितीत शाळेच्या विविध विषयावर सुधार व बदल करण्यासाठी समिती मधील सदस्यांनी आणि शैक्षणिक प्रगतीसाठी अतिरिक्त वेगळे तासिका घेण्यासाठी सांगण्यात आले. शालेय पोषण आहारामध्ये विशेष बदल करण्यासाठी सांगितले गेले, सर्व शिक्षक शाळेवर वेळेच्या आत हजर राहण्यासाठी हजर राहून काम करण्यासाठी सूचना करण्यात आल्या.
दहावीचा निकाल वाढवण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न शिक्षकांनी व पालकांनी व सदस्यांनी करावेत, त्यावेळी शालेय सुधार समितीचे सदस्य संजीव पोतले, पंढरी जाधव, तुळशीराम राठोड, चंद्रकांत भोसले, तैमूर साहेब सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.