मत्स्य विज्ञान महाविद्यालय, उदगीर तर्फे ‘‘जागतिक मत्स्य व्यवसाय दिवस’’ साजरा

मत्स्य विज्ञान महाविद्यालय, उदगीर तर्फे ‘‘जागतिक मत्स्य व्यवसाय दिवस’’ साजरा

उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर येथील मत्स्य विज्ञान महाविद्यालय उदगीर व शिवाजी महाविद्यालय, उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने 21 नोव्हेंबर हा दिवस ‘‘जागतिक मत्स्य व्यवसाय दिवस’’ म्हणुन साजरा करण्यात आला. या निमीत्ताने शिवाजी महाविद्यालय, उदगीर येथे मत्स्य प्रदर्शन व मत्स्य व्यवसायातील उद्योजकतेच्या संधी या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्हि.ए. जाधव यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. या प्रसंगी त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मत्स्य व्यवसायाचा सखोल अभ्यास करावा, व स्वतःचा उद्योग सुरू करून यशस्वी उद्योजक होण्याचे आवाहन केले. कार्यक्रमामध्ये मत्स्य विज्ञान महाविद्यालयाचे प्रभारी सहयोगी अधिष्ठाता डॉ. ए.टी. मरकड यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यानी जागतिक मत्स्य व्यवसाय दिवसाचे महत्व विषद केले. तसेच भारताच्या आर्थिक उन्नती मध्ये मत्स्य व्यावसायाच्या योगदाना विषयी मार्गदर्शन केले. या दिवसाचे औचीत्य साधुन त्यांनी जलाशय व इतर नैसर्गीक साधन संपत्तीचे संवर्धन करणे अत्यंत आवश्यक असल्याचे सागीतले.

मत्स्य प्रदर्शना मध्ये रंगीबेरंगी माशांचे मत्स्यालय, संवर्धन योग्य माशांचे व आधुनीक मत्स्य संवर्धनाचे विविध मॉडेल्स व बॅनर्स, समुद्रात वापरले जाणारे बोटीचे मॉडेल्स, मुल्यवर्धीत मत्स्य पदार्थ निर्मीती चे बॅनर्स व विविध माशांचे मॉडेल्स मांडण्यात आले होते. एक दिवसीय कार्यशाळेमध्ये ’’मत्स्य व्यवसायातील स्वयंरोजगाराच्या विविध संधी’’ या विषयावर डॉ. ए.एस. कुलकर्णी व ‘‘शोभीवंत मत्स्य पालन’’ या विषयावर डॉ. एम.एम. गिरकर यांनी व्यांख्यान दिले. याच कार्यक्रमात विद्यार्थी चर्चासंत्रामध्ये प्रा. एस.आर. यादव व प्रा. एस.एस. घाटगे यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे निरसन केलेे. चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी प्रा. व्हि. बी. सुतार व प्रा. डॉ. ए. यु. शिरसी हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा. एस.एन. कुंजीर यांनी केले. व प्रस्तावना प्रा. ए.टी. तांदळे यांनी केली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. डॉ. एस.डी. निटूरे यांनी केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मत्स्य विज्ञान महाविद्यालयाचे एन.बी. धुळे, सहाय्यक कुलसचिव, नितीन बिरादार, चंद्रकांत मादळे, बाळकीशन घुगे यांनी सहकार्य केले. तसेच महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी मत्स्य प्रदर्शन व कार्यशाळा यशस्वी करण्याकरीता अथक परिश्रम घेतले.

About The Author