बांधकामावरील लोखंडी साहित्य चोरणारी टोळी जेरबंद, 22 लाख 97 हजार रुपयाच्या मुद्देमाल हस्तगत
लातूर (एल.पी.उगीले) : जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी नवीन बांधकामाच्या जागेवर लोखंडी साहित्य आणून ठेवल्यानंतर त्या ठिकाणी कोणी नाहीत याची पाहणी करून, त्या बांधकामावरील साहित्याची चोरी करणारे टोळके लातूर पोलिसांनी अटक करून चोरलेले साहित्य आणि हे साहित्य चोरण्यासाठी उपयोगात येणारे वाहन असे एकूण 22 लाख 97 हजाराचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.
याबाबत थोडक्यात हकीकत अशी की, पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी लातूर जिल्ह्यामध्ये होणारे चोरी व घरफोडी चे गुन्हे उघडकीस आणण्याचे निर्देशित करून सूचना दिल्या होत्या.
त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक .
सोमय मुंडे,अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी (लातूर शहर) जितेंद्र जगदाळे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांचे नेतृत्वात विविध तपास पथके तयार करण्यात आली होती. सदरच्या पथकामार्फत जिल्ह्यात घडलेल्या,विविध पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपींची माहिती मिळवण्यात येत होती.
गुन्ह्याची माहिती काढत असताना दिनांक 22 नोव्हेंबर 2022 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, जिल्ह्यातील विविध नदी, रस्त्याच्या पुलावरील लोखंडी प्लेट्स तसेच विविध भागातून नागरिकांच्या चालू असलेल्या बांधकामाचे मूल्यवान लोखंडी साहित्य चोरणारी टोळी कार्यरत असून सदरच्या टोळीने चोरलेला मुद्देमाल भांबरी परीसरातील गोडाऊनच्या पाठीमागे लपवून ठेवलेले आहे. ते साहित्य वाहनांमध्ये भरून इतरत्र विक्री करणार आहेत, अशी माहिती मिळाली. सदर माहितीची शहनिशा व विश्लेषण करून खात्री पटल्याने सदर पथकाने भाबंरी येथील तीन गोडाऊन असलेल्या परिसरात छापा मारला. तेथे विविध प्रकारचे लोखंडी साहित्य वाहनामध्ये भरत असताना काही इसम संशयस्पदरीत्या मिळून आले. त्यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी त्यांचे नावे
रामेश्वर चंद्रकांत हाके(वय 27 वर्ष, राहणार आसराचीवाडी, तालुका रेनापुर, सध्या राहणार भांबरी चौक, लातूर), प्रशांत अशोक गाडेकर,(आहे वय 27 वर्ष, राहणार भादा, तालुका औसा. सध्या राहणार भांबरी चौक,लातूर ), श्रीकांत चंद्रकांत हाके,(वय 18 वर्ष, राहणार आसराचीवाडी, तालुका रेनापुर. सध्या राहणार भांबरी चौक,लातूर)
विष्णू भगवान केकान, (वय 36 वर्ष, राहणार चाटगाव तालुका धारूर, जिल्हा बीड. सध्या राहणार स्वप्नपूर्ती आपारमेंट, एलआयसी कॉलनी, लातूर), दिगंबर भागवत गवळी,( वय 29 वर्ष, राहणार शिंदगाव, तालुका रेनापुर. सध्या राहणार मुक्तेश्वर शाळेजवळ, प्रकाश नगर, लातूर),ऋषिकेश उर्फ आप्पा गुरुलिंग शेटे(, वय 22 वर्ष, राहणार कुलस्वामिनी नगर,5 नंबर चौक, लातूर)असल्याचे सांगितले.
तसेच त्यांच्या ताब्यात असलेल्या लोखंडी साहित्य व वाहनाबद्दल विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की, गेले काही महिन्यापासून लातूर जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणाहून नागरिकांच्या चालू असलेल्या बांधकामावरील तसेच रस्ते व नदीवरील पुलाचे बांधकामच्या ठिकाणाहून सदरचे लोखंडी साहित्य चोरी करून येथे जमा करून ठेवल्याचे सांगितले.
त्यावरून पोलीस पथकाने सदर साहित्याचे मोजमाप करण्यासाठी पाहणी केली असता त्यामध्ये नदी व रस्त्याचे बांधकामा करिता लागणारे मोठ्या लोखंडी प्लेट्स, दोन ऑक्सिजनचे मोठे सिलेंडर, हेवी लोखंडी गरडेल, चौरस लोखंडी पाईप, लोखंडी चॅनल्स, लोखंडी अँगल, लांब पोल,लोखंडी आय बीम मोठ्या प्रमाणात आढळून आले. तसेच नमूद आरोपींनी कव्वा नाका येथून काही महिन्यापूर्वी चोरी केलेला छोटा हत्ती, चोरलेल्या लोखंडी साहित्याची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येणारे दोन पिकअप व छोटा हत्ती अशी वाहने सदर ठिकाणी मिळून आले.
सदर ठिकाणी मिळून आलेल्या साहित्याबाबत लातूर जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनच्या अभिलेखाची पाहणी केली असता पोलीस ठाणे , लातूर ग्रामीण
गुन्हा रजिस्टर क्रमांक 244/2022 कलम 379 भादवी, पोलीस ठाणे,औसा गुन्हा रजिस्टर क्रमांक 214/2022 कलम 379 भादवी, पोलीस ठाणे, रेणापूर गुन्हा रजिस्टर क्रमांक 364/2022 कलम 379 भादवी,
पोलीस ठाणे,गांधी चौक, गुन्हा रजिस्टर क्रमांक 455/2022, कलम 379 भादवी,
पोलीस ठाणे,गातेगाव गुन्हा रजिस्टर क्रमांक 147/2022 कलम 379 भादवी,
येथे बांधकामाचे वर नमूद प्रकारातील लोखंडी साहित्य चोरीला गेले बाबतचे गुन्हे दाखल असल्याचे पोलीस पथकाच्या निदर्शनास आले.
त्यावरून वर नमूद वर्णनाचा 22 लाख 97 हजार 228 रुपये किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला, पुढील कार्यवाही करिता मुद्देमाल व आरोपी संबंधित पोलीस स्टेशनला हजर करण्यात आले आहे.
सदरच्या पथकाने गुन्ह्याची माहिती मिळताच वरिष्ठांचे मार्गदर्शनात नियोजनबद्ध व अतिशय वेगवान हालचाली करून लातूर जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या पाच गुन्ह्यात चोरलेला 22 लाख 97 हजार रुपये किमतींचा मुद्देमाल आरोपीसह ताब्यात घेतला आहे.
सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांच्या नेतृत्वातील पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल बहुरे, पोलीस अंमलदार राजेंद्र टेकाळे, रामहरी भोसले, प्रकाश भोसले, नवनाथ हासबे, मोहन सुरवसे, नानासाहेब भोंग, राजेश कंचे, तुराब पठाण, नकुल पाटील, चंद्रकांत केंद्रे यांनी केली आहे.