बाबुराव बिरादार यांना महात्मा फुले महाविद्यालयात श्रद्धांजली
अहमदपूर (गोविंद काळे ) : येथील महात्मा फुले महाविद्यालयातील संस्कृत विभाग प्रमुख डॉ. प्रशांत बिरादार यांचे वडील बाबुराव गणपतराव बिरादार (वय ७०वर्ष) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाल्याबद्दल त्यांना महाविद्यालयाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याबाबतचे सविस्तर वृत असे की, कै. बाबुराव गणपतराव बिरादार यांचे अल्पशा आजाराने दि. २७ नोव्हेंबर २०२२ रोजी दुपारी २ वाजता दुःखद निधन झाले. त्यांचा अंत्यविधी दि. २८ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी दहा वाजता त्यांच्या मूळ गावी चवण हिप्परगा ता. देवणी जि. लातूर येथे होणार आहे. ते अहमदपूर येथील महात्मा फुले महाविद्यालयातील संस्कृत विभाग प्रमुख तथा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या संस्कृत अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ.प्रशांत बिरादार यांचे वडील होते. त्यांच्या दुःखद निधनाबद्दल प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी तसेच सर्व प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. कै. बाबुराव बिरादार यांच्या पश्चात एक मुलगा, सून, एक मुलगी, नात, नातू असा परिवार आहे.