आ. बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील श्री स्वामी समर्थ मंदिर देवस्थान येथे दत्त जयंती निमित्त अखंड जप यज्ञ नाम सोहळ्याच्या तिसऱ्या दिवशीचे यजमान आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते श्री स्वामी समर्थ महाराज यांची आरती करण्यात आली. स्वामींच्या चरणी नतमस्तक झाल्यावर एक वेगळ्याच प्रकारची ऊर्जा मिळाली असे आमदार म्हणाले. यावेळी माजी सभापती शिवानंद हेंगणे, माजी जि.प सदस्य माधवराव जाधव, सामाजिक कार्यकर्ते ओमकार पाटील, माजी नगरसेवक अभयजी मिरकले, अविनाशजी देशमुख, सचिनजी पडिले, प्रकाशजी फुलारी, गजानन परांडे, गणेश कोदळे, अनिल डाके, शंकर सारोळे आदी मान्यवर भाविक, भक्त, महिला भगिनी मोठया प्रमाणात उपस्थित होत्या.
