लोहारा येथील युवकांचा मनसेत जोरदार प्रवेश
उदगीर (एल.पी.उगीले) : आज सलग दुसऱ्या दिवशी उदगीर तालुक्यात मनसेत तरुणांचा पक्षप्रवेश घेण्यात आला राज ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन लोहारा येथील युवा तरुणांनी पक्षप्रवेश केला. या पक्षप्रवेशावेळी जिल्हाध्यक्ष संजय राठोड यांनी सर्वांचे स्वागत करून कार्यकर्त्यां सोबत संवाद साधला.
मनसे हा पक्ष सर्वसामान्य जनतेसाठी काम करणारा पक्ष असून भविष्यात जनतेला जास्तीत जास्त सुख सुविधा देण्यासाठी आपणास स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढवून त्या संस्था ताब्यात घ्याव्या लागतील, राज ठाकरे यांनी मनसे पक्षात जातीपातीला महत्त्व न देता काम करणाऱ्या महाराष्ट्र सैनिकांना न्याय देण्याची भूमिका घेतली आहे. सर्वांना कामाच्या बळावर मोठे होण्याची संधी उपलब्ध आहे. असे मत व्यक्त केले.
यावेळी लोहारा येथील ओमकार कस्तुरे यांच्या पुढाकाराने हर्षद सोनटक्के ,सुमित सोनटक्के ,चैतन्य सोनटक्के ,बेलुरे महालिंग , शिंदे गणेश, हालसे चंद्रशेखर यांनी प्रवेश केला. यावेळी शहराध्यक्ष संतोष भोपळे, मनसेचे रामदास तेलंगे, तालुका उपाध्यक्ष गुरुदत्त घोणसे,दयानंद डोंगरे , शहर उपाध्यक्ष लखन पुरी , विभागाध्यक्ष शिवाजी देवकते, गोविंद केंद्रे, अविनाश ठाकुर, तुषार बुलबुले , दत्ता कालेवाड इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
