कमालनगर येथे शेतकरी उत्पादक कंपनीचे भव्य स्वरूपात उदघाटन सोहळा संपन्न
कमालनगर (एल.पी.उगीले) : सीमा भागातील बिदर जिल्ह्यातील कमालनगर तालुका येथील कमलनगर येथे शेतकरी उत्पादक कंपनी चे भव्य स्वरूपात कार्यालय उदघाटन सोहळा संपन्न झाला. यावेळी तालुका कृषी अधिकारी अंसरी मॅक यांनी कार्यालयाचे उदघाटन केले. तसेेच पांडुरंग पाटील व वीरभद्रेश्वर खंडागळे फलोत्पादक अधिकारी हे सुध्दा कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष रंगराव जाधव, अध्यक्ष कृषी उत्पन्न बाजार समिती औराद हे होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रदीप बिरादार यांनी केले. कृषी अधिकारी अंसारी यांनी उपस्थित शेतकऱ्यांना उत्पादक कंपनीचे महत्त्व व भुमिका समजावून सांगितली. शेतकऱ्याना आपल्या मालाला मोठी बाजारपेठ व बाजारात योग्य भाव मिळवूू देण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपनीची नितांत गरज आहे. असे फलोत्पादन अधिकाऱ्यांनी सांगितले. प्रत्येकाने नियोजनबद्ध शेती केली पाहिजे. भाजीपाला प्रत्येक शेतकऱ्याने थोड्या प्रमाणात तरी केला पाहिजे. दैनंदिन खर्च भागवण्यासाठी व मार्केट मधिल भावातील चढउतारपणा आपल्या लक्षात येण्यासाठी कंपनीच्या कार्यालयाशी संपर्क ठेवणे, ही काळाची गरज आहे.
सतीश वासरे यांनी शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी सुध्दा कंपनीची मदत होईल, हे त्यांनी स्पष्ट केले, त्यावेळी मारुती वाडीकर, कमालनगर रयत संघाचे अध्यक्ष प्रवीण कुलकर्णी, पिकेपिएस चे उपाध्यक्ष बाबुराव बिरादार, माधवराव चांगुणे, बालाजी जाधव, गोविंद वाडीकर, संतोष राठोड इत्यादी मान्यवर व शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यालयाच्या शुभारंभ प्रसंगी सर्वांनी उपस्थित राहून शुभाशीर्वाद दिल्याबद्दल संचालक मंडळातर्फे अंकुशराव वाडीकर यांनी आभार प्रदर्शन व समारोप केला.
