वुशु कुंग फु मार्शल आर्ट्स अकादमी इंडिया उदगीर चे यश

वुशु कुंग फु मार्शल आर्ट्स अकादमी इंडिया उदगीर चे यश

उदगीर (एल.पी.उगीले) : मुंबई ठाणे येथे ओपन नॅशनल कराटे स्पर्धेत उदगीर च्या 12 खेळाडूंची निवड झाली आहे. ग्रँड मास्टर चंद्रकांत बलाढे बेंगलोर यांच्या अंतर्गत करण्यात आलेली हि स्पर्धा वयोगट व वजन गटात खेळवण्यात आली. या स्पर्धेत 500 खेळाडूचा सहभाग होता. उदगीरच्या खेळाडूनी आपआपल्या वयोगट व वजन गटात गोल्ड मेडल व शिल्वर मेडल, ब्रांच मेडल मिळउन शिखर गाठले. या खेळाडूंना अहोरात्र कराटे चे प्रशिक्षण देऊन मेडल मिळउन देण्याचे काम सोळुंके मारोती यांनी केले आहे.

यात 12 गोल्ड व 7 सिल्व्हर व 5 ब्रांच मेडल मिळवले. या स्पर्धेतील खेळाडूंची नावे सार्थक नेत्रगावे , गोल्ड सिल्व्हर मेडल,श्रीनाथ पांचाळ, काता कुमीतेत, गोल्ड मेडल ,मयुरी शेगडेवार,व शेख आजान, खाडे संकेत, खताब पठाण, अरहम पठाण, अर्णव सोळुंके, नमन सवर्णकार, अक्षयकुमार सोळुंके, प्रणव यलमटे, प्रणव पंढरपूरे,यांचा समावेश होता.

यांचे गुणगौरव करण्यासाठी प्रमुख अतिथी म्हनुन उदगीरचे आमदार संजय भाऊ बनसोडे यांच्या हस्ते सोळुंके मारोती व सोळुंके बालाजी व सर्व खेळाडू यांचा सत्कार महात्मा पब्लिक स्कूलच्या वतीने संगीता दिपक नेत्रगावे यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

आ.बनसोडे यांनी बोलयांना सांगितले की, कराटे शिकणे काळाची गरज आहे. मुला मुलीनी कराटे शिकुन निरोगी राहाता येते, व स्वत: चे स्वरक्षन स्वत: करता येते.या प्रसंगी त्यांनी सोळुंके मारोती, खेळाडूंचे व संगीता नेत्रगावे यांचे कौतुक केले, यावेळी महात्मा पब्लिक स्कूलच्या संचालिका सौ संगीता नेत्रगावे पाटील,मुख्याध्यापिका स्मिता तिवारी, शिक्षिका अश्विनी ममदापुरे, मोनिका सुने,जयश्री घोंगडे,शिवकन्या वाघमारे, शिल्पा सांगवे, पांचाळ मावशी यांचे सहकार्य लाभले.

यावेळी राष्ट्वादी काँग्रेस च्या चंचलाताई घुगे, दिपाली औटे, राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष समीर शेख व चित्रपट साहित्य कला व सांस्कतिक विभाग प्रमुख अभिजित औटे, चंद्रकांत पाटील, महात्मा पब्लिक स्कूलचे पालक प्रतिनिधी सुशील कुमार शिंदे, तसेच लालबहादूर शास्त्री शाळेच्या शिक्षिका नीता मोरे , प्रशांत आचार्य, महादेव आचार्य यांची उपस्थिती लाभली.

About The Author

error: Content is protected !!