तालुक्यातून एकही सरपंच बिनविरोध नाही, सोळा सदस्य बिनविरोध
उदगीर (एल. पी. उगीले) : उदगीर तालुक्यातील 26 ग्रामपंचायतीच्या निवडणुका 18 डिसेंबर रोजी संपन्न होत आहेत. त्या दृष्टीने निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून उमेदवारी अर्ज चाचणी अर्थात उमेदवारी अर्जाची वैध/अवैध निवडीअंति तीन सदस्यांचे अर्ज अवैध ठरल्याने आता रिंगणात 671 सदस्य राहिले आहेत.
या निवडणुकात सर्वाधिक म्हणजे सात सदस्य चिमाचीवाडी येथील बिनविरोध निघाले आहेत. तर मन्ना उमरगा आणि कल्लूर या ठिकाणचे दोन दोन सदस्य बिनविरोध निघाले आहेत. तसेच सुकणी, देवर्जन, तोगरी , सताळा (बुद्रुक), मोर्तळवाडी येथील प्रत्येकी एक सदस्य बिनविरोध आला आहे. बिनविरोध सदस्यांमध्ये तोगरी येथून एसटी प्रवर्गातून तेलंगे राजकुमार विठ्ठलराव तसेच एसटी प्रवर्गातून देवर्जन येथून माचोळे सुधाकर माणिक, तर सताला आणि सुकनी येथून इतरमागास प्रवर्गातून नरहरे आयोध्या प्रशांत आणि कनकुरे सुनीता गंगाधर तसेच कल्लूर येथून सर्वसाधारण गटातून कविता राम देवकते तसेच इतर मागास महिला प्रवर्गातून तहुरा मुष्कर तांबोळी यांची निवड करण्यात आली आहे. मन्ना उमरगा येथील एसटी महिला प्रवर्गातून सुरेखा नामदेव निलेवाड तर सर्वसाधारण महिला वर्गातून शिंदे अर्चना राम यांचा समावेश आहे.
चीमाचीवाडी येथून मागासवर्गीय प्रवर्गातून गुंडीले रामदास किशन, सर्वसाधारण महिला गटातून चंदे सुनंदा हरिदास, जाधव कालिंदी वामन इतर मागास प्रवर्गातून बंडे प्रशांत गोपीनाथ, सर्वसाधारण महिला प्रवर्गातून गुनाले रंजना नामदेव, सर्वसाधारण गटातून गुरमे अनिल माधवराव, मागास महिला प्रवर्गातून दुर्गावाढ मीनाक्षी प्रमोद या बिनविरोध आल्या आहेत. तसेच मोर्ताळवाडी येथून सर्वसाधारण महिला गटातून वेतलवाड उज्वला जाधव या बिनविरोध आल्या आहेत. एकूण सोळा सदस्य उमेदवारी अर्ज चाचणीत बिनविरोध आले असले तरी, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अर्थात सात डिसेंबरच्या नंतरच तालुक्यातील एकूण चित्र स्पष्ट होणार आहे. बिनविरोध सदस्यांची आणि सरपंचांची संख्या वाढावी या दृष्टीने राजकीय लोकप्रतिनिधी प्रयत्नशील असल्याचेही बोलले जात आहे.
