लोणीमोडच्या जि.प.प्रा.शाळेत भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन
उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर तालुक्यातील लोणीमोडच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत “शिका, संघटीत व्हा अन् संघर्ष करा!” असा संदेश देणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना मुख्याध्यापक संजय वाघमारे याच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक संजय वाघमारे तर प्रमुख पाहुणे म्हणून सुगंधी भाग्यलक्ष्मी, निर्मला वाघमारे उपस्थित होते. विद्यार्थ्याना डाॅ. बाबासाहेब आंबेडकर विषयी मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी शाळेतील शिक्षक व विद्याथीॅ यांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकराच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन अभिवादन केले . यावेळी शाळेतील विद्याथीॅ किर्ती काळे, स्नेहा सुरनर, सिमरन अन्सारी, सार्थक चापलवाड, गणेश सुवर्णकार , राजनंदनी वाघमारे,सादिया शेख, सोयफ शेख,रज्जाक शेख, त्रिशा पिटलवाड,जान्हवी केंद्रे , श्रेया सुर्यवंशी ,सना पठान,आलिया मुंजेवार,रोशनी कानुरे,सोनाक्षी सुरनर, अरखाम शेख ,समर्थ सुरनर,प्रसाद खपरले,राहिल शेख,अखलाख शेख,हे विद्याथीॅ व पालक उपस्थित होते.
