श्यामलाल हायस्कूलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन

श्यामलाल हायस्कूलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन

उदगीर (एल.पी.उगीले) : येथील श्यामलाल मेमोरियल हायस्कूल मध्ये भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. मुख्याध्यापक आनंद चोबळे, प्रभारी उप मुख्याध्यापक बालाजी चव्हाण, प्र.पर्यवेक्षक राहुल लिमये, इंग्रजी विभाग प्रमुख संजय देबडवार सांस्कृतिक विभाग प्रमुख सुनील बागडे, संस्कृत विभाग प्रमुख प्रमोद कावरे, क्रीडा प्रमुख दिनेश बोळेगावे यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार व पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

देवने श्रुती,जाधव समीक्षा, म्हेत्रे दिपाली या विद्यार्थिनींनी प्रभावीरीत्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याविषयी माहिती सर्व विद्यार्थ्यांना दिली. तसेच सह शिक्षक उमाकांत सूर्यवंशी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्याविषयी माहिती आपल्या भाषणातून दिली. व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या डोळ्यासमोर ठेवून ज्ञानार्जन करावे, यासंबंधी मार्गदर्शन केले.

अध्यक्ष समारोपामध्ये शाळेचे मुख्याध्यापक आनंद चोबळे यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय जीवनामध्ये भारतरत्न, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श समोर ठेवून आपले कार्य करावे, भारतीय समाजात ज्या समस्या,अडचणी आहेत. त्या कशा दूर होतील व आपला भारत देश समृद्ध कसा होईल? यासाठी सर्वांनी प्रयत्न करून त्यासंबंधी कार्य करावे. हीच खरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना श्रद्धांजली असेल यासंबंधी मत व्यक्त केले. संस्थाध्यक्ष ऍड.सुपोषपाणि आर्य यांनी महामानव, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, बोधिसत्व, प्रज्ञासूर्य, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य स्वतंत्र भारताच्या लोकशाही प्रधान देशात अतिशय मोलाचे आहे. त्यांच्या कार्याचा आदर्श सर्व स्तरातील व्यक्तींनी डोळ्यासमोर ठेवून देशहितासंबंधी कार्य करावे, असा संदेश दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नामदेव हाके यांनी केले तर आभार व्यक्त करण्याचे कार्य प्रमोद कावरे यांनी केले.

About The Author

error: Content is protected !!