शिवाजी महाविद्यालयात महापरिनिर्वाण दिन साजरा
उदगीर (एल.पी.उगीले) : शिवाजी महाविद्यालयात महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले . यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विनायक जाधव यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. महाविद्यालयातील प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना विनम्र अभिवादन केले. सूत्रसंचालन जयंती प्रमुख प्रो.डॉ.सुरेश शिंदे यांनी तर आभार डॉ सी जे देशमुख यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील सर्व कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
