ओपन नॅशनल कराटे स्पर्धेत सार्थक नेत्रागावे यास गोल्ड मेडल
उदगीर (एल.पी.उगीले) : ओपन नॅशनल कराटे स्पर्धेमध्ये सार्थक नेत्रागावे याने घवघवीत यश मिळविले आहे.
मुंबई येथे झालेल्या ओपन नॅशनल कराटे स्पर्धेमध्ये लाल बहादूर शास्त्री विद्यालयात शिकणारा सार्थक दीपक नेत्रागावे याने गोल्ड मेडल प्राप्त केल्याबदल माजी गृहराज्यमंत्री आमदार संजय बनसोडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या प्रसंगी जि. प.माजी सदस्य ज्ञानेश्वर पाटील, समीर शेख, सुशीलकुमार शिंदे, बाळासाहेब मरलापल्ले सरपंच चंद्रशेखर पाटील, अभिजीत औटे, संगीता नेत्रागावे, दीपाली औटे, चंचला हुगे, स्मिता तिवारी, प्रशिक्षक मारोती साळुंखे,अश्विनी ममदापुरे, मोनिका सुने, शिवकन्या वाघमारे, शिल्पा सांगवे, प्रशांत आचारे, महादेव आचारे आदी उपस्थित होते.
