शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने वीज बिलाची होळी

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने वीज बिलाची होळी

उदगीर (एल. पी. उगिले) : शिवसेनेच्या वतीने शिवसेनाप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे आणि युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते चंद्रकांत खैरे, मराठवाडा समन्वयक विश्वनाथ नेरुळकर, शिवसेना जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाच्या वतीने विज बिल सक्ती केल्यामुळे व विमा कंपनीच्या दादागिरीच्या विरोधात चक्काजाम आंदोलन आणि वीज बिलाची होळी करण्याचा निर्णय शिवसेनेच्या वतीने घेण्यात आला. उदगीर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवसेना तालुकाप्रमुख कैलास पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाच्या वेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अंकुश कोनाळे, शिवसेनेचे उदगीर विधानसभा अध्यक्ष श्रीमंत दादा सोनाळे, शहर प्रमुख मुन्ना पांचाळ, विधानसभा समन्वयक प्रकाश हैबतपुरे, शिवसेना तालुका संघटक बालाजी पुरी, शहर संघटक संजय मठपती, युवासेना तालुकाप्रमुख चंद्रकांत सांगळे, शिवसेना तसेच युवा सेना व इतर विभागाच्या आजी-माजी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हे आंदोलन यशस्वी केले.

याप्रसंगी शिवसेना महिला आघाडीच्या अरुणाताई लेंडाने, दिपाली भोसले, नंदा पांढरे, प्रज्ञा सूर्यवंशी, शाला मारमवार,तसेच बन्सीलाल कांबळे ,सुरेश गर्जे ,अरुण बिरादार, विधिज्ञ विष्णुकांत चिंतलवार, बेंबडे अण्णा, महेश फुले, व्यंकट केसगिरे, मोईन पटेल, जमीर मलंग, सय्यद वाजीद, शेख ईदरीस, कलीम सिद्दिकी, शेख रहमत, शेख सलमान, तमीज मलंग, नबीजी यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अन्नसुरक्षा आयोगाने शेतकरी हा जनतेसाठी अन्न पिकवतो. त्यामुळे या जगाच्या पोशिंद्याला प्रोत्साहन द्यावे. त्याचा विद्युत पुरवठा खंडित केला जाऊ नये. अशा पद्धतीच्या आदेश असताना देखील त्या आदेशाला केराची टोपली दाखवत सरकार आणि त्यांचे हस्तक असलेले अधिकारी हे शेतकरी आणि गोरगरीब जनतेवर अन्याय, अत्याचार करत वीज बिलाची सक्ती करत आहेत. याचा निषेध करण्यासाठी आपण वीज बिलाची होळी करत असल्याची माहिती कैलास पाटील यांनी याप्रसंगी दिली.

About The Author

error: Content is protected !!