महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
उदगीर (एल.पी.उगीले) : येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी संस्थेचे सचिव रामचंद्र तिरूके, उपाध्यक्ष ॲड.प्रकाश तोंडारे, सहसचिव डॉ.रामप्रसाद लखोटिया, सदस्य बसवराज पाटील मलकापूरकर, शिवराज वल्लापुरे, ललिता पाटील, प्रशांत पेन्सलवार, प्रभारी प्राचार्य डॉ.बी.एम.संदीकर, उपप्राचार्य(व.म.) डॉ.आर.के.मस्के, उपप्राचार्य(क.म.) सी.एम.भद्रे, पर्यवेक्षक प्रा.जे.आर.कांदे, स्टाफ सेक्रेटरी प्रा.डॉ.जयप्रकाश पटवारी, प्रा.प्रवीण आंबेसंगे यांच्यासह प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
