मुन्ना पाटलांनी मलकापूरचा कायापालट केला – राजेश्वर नीटुरे

मुन्ना पाटलांनी मलकापूरचा कायापालट केला - राजेश्वर नीटुरे

उदगीर (एल. पी. उगिले) : उदगीर शहराचे उपनगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मलकापूर गावचा सर्वांगीण विकास करून मुन्ना पाटील यांनी विकासाचा एक नवा अध्याय रचला आहे. कोट्यावधी रुपयांच्या विविध योजना नागरी सुविधा पुरवण्यासाठी प्रयत्न करून त्यांनी आणल्या आहेत. मुन्ना पाटील यांच्याकडे विकासाची जाण आणि भान असल्यामुळे मुन्ना पाटलाला मत म्हणजे विकासाला मत होय. असे विचार काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे यांनी व्यक्त केले.

ते मलकापूर ग्रामपंचायतीच्या मुन्ना पाटील पॅनलच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. याप्रसंगी उदगीर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष कल्याण पाटील, उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती रामराव मामा बिरादार, सुभाष धनुरे, राहुल आंबेसंगे, मनोहर कांबळे इत्यादी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा मलकापूर ग्रामपंचायतीचे उपसरपंच आणि विद्यमान सरपंच पदाचे उमेदवार सिद्धेश्वर उर्फ मुन्ना पाटील यांनी केले.

आपल्या प्रस्ताविकात त्यांनी आपल्या कार्यकाळात केलेल्या विकास कामाच्या संदर्भात सविस्तर माहिती सांगितली. याप्रसंगी बोलताना कल्याण पाटील म्हणाले की, मलकापूर गावात विकासासाठी भरपूर निधी तर आलाच आला, त्यासोबतच नागरी सुविधा पुरवण्यासाठी मुन्ना पाटील सतत जनतेच्या आणि लोकप्रतिनिधींच्या संपर्कात कायम राहिले. विकासासोबतच जनतेबद्दलचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध त्यांनी जपले आहेत. अत्यंत हळवा आणि भोळ्या स्वभावाचा माणूस म्हणून मुन्ना पाटलाची ओळख आहे. त्यांनी विकासाचे काम भरपूर केले आहे, एखादे काम राहिले असेलही मात्र त्यांनी सर्व ग्रामस्थांची मने जिंकली आहेत. कोणालाही वाकडे बोलने किंवा कोणाचे नुकसान केले असे कधीच झाले नाही. त्यामुळे मुन्ना पाटलाचा विजय ही काळ्या दगडावरची रेघ आहे, असे सांगितले.

याप्रसंगी बोलताना रामराव बिरादार म्हणाले की, खरे तर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी इतकी मोठी माणसे प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी येण्याची आवश्यकता नाही. मात्र आपल्या गावचा एखादा माणूस मोठा होतो आहे. याचा स्वाभिमान बाळगण्यापेक्षा त्याच्याबद्दलची ईर्षा वाढू लागल्याने ही निवडणूक लागली आहे. विकास पर्व निर्माण करणाऱ्या मुन्ना पाटलांना खरे तर बिनविरोध निवडून द्यायला पाहिजे होते, मात्र विरोधासाठी विरोध म्हणून कोणीतरी फॉर्म भरला असेल त्याकडे जनतेने फारसे गांभीर्याने पाहू नये. नागरी सुविधा पुरवून खऱ्या अर्थाने गावचा विकास करण्याची क्षमता असलेल्या व्यक्तिमत्त्वाला साथ द्यावी, असे आवाहन केले.

पुढे बोलताना राजेश्वर नीटूरे म्हणाले की, मुन्ना पाटलांनी रस्ते, नाल्या, पाणी, वीज या अत्यावश्यक असलेल्या नागरी सुविधा प्राधान्य क्रमाने पुरवल्या आहेत. भविष्यकाळात कधीही पाणीटंचाई किंवा पाण्याची अडचण निर्माण होणार नाही, यासाठी 14 कोटी रुपयांची जलजीवन योजना मंजूर करून घेतली आहे. महाविकास आघाडीचा धर्म पाळत उदगीरच्या विकासाचा विचार करून आमदार संजय बनसोडे यांना घडवण्यामध्ये सिद्धेश्वर उर्फ मुन्ना पाटील यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळेच मलकापूर साठी मोठ्या प्रमाणात विकास निधी उपलब्ध होऊ शकला. भविष्यातही या गावाच्या विकासासाठी जनतेच्या सुखदुःखासाठी आपण सदैव तत्पर आहोत. असेही त्यांनी स्पष्ट केले.

याप्रसंगी दिगंबर बिरादार, ज्ञानेश्वर सावळे, रमाकांत हत्ते, इस्माईल बागवान, हैदरअली बागवान, रामकिशन नादरगे, सौ महानंदा मोरे, सौ. सपना धनबा, प्रताप भालेराव, अविनाश वाकुडे, लाळे गुंडेराव, ढगे संदेश ,नरसिंग शिंदे, धीरज उर्फ बंटी कसबे, पठाण फिरोज, शेख ईक्रमोद्दीन, राहुल पाटील, मोहन कांबळे, बिरादार प्रवीण, देशमुख प्रभाकर, हालबुर्गे विष्णुकांत, जितेंद्र बोडके, विनायक टकटवळे,याला, सौ. रत्ना गायकवाड, बाबुराव भोसले, बसवराज पाटील, सोमनाथ पाटील, राजपाल पप्पू, दयानंद भालेराव, बालाजी बोबडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन प्रा. माधव खताळ यांनी केले.

About The Author

error: Content is protected !!