मानव मुक्तीचे कार्य व संविधान डॉ. आंबेडकर यांच्यामुळेच – सतिश उस्तुरे

मानव मुक्तीचे कार्य व संविधान डॉ. आंबेडकर यांच्यामुळेच - सतिश उस्तुरे

उदगीर (एल.पी.उगीले) : समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्यायाच्या तत्त्वांची समाजात रुजवण करून मानव मुक्तीचे महान कार्य संविधानाच्या माध्यमातून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच झाले. असे प्रतिपादन मातृभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सतिश उस्तुरे यांनी केले. ते राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रम प्रसंगी केले. यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या उषा कुलकर्णी , कार्यक्रमाधिकारी प्रा. बिभीषण मद्देवाड, यांची उपस्थिती होती.

पुढे बोलतांना उस्तुरे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण विश्वाला मानवतेची शिकवण दिली. स्त्री मुक्तीचा मार्ग दाखवला, समस्त मानव जातीचे कल्याण केले.आजची सुदृढ लोकशाही डाॅ बाबासाहेबामुळेच आसल्याचे सांगीतले .कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी ,प्रा. उस्ताद सय्यद ,प्रा. रणजित मोरे ,प्रा. रुपाली कुलकर्णी ,प्रा. धोंडीबा जोशी , नंदु बयास , संतोष जोशी , आकाश राठोड , अन्वेष हिपळगावकर , प्रा. आशा पवार , प्रा. रेखा रणक्षेत्रे , प्रा. अश्विनी देशमुख , प्रा. रुपाली कुलकर्णी , उषा सताळकर , ओमकारे जगदीशा , मीरा पाटील , प्रा. राजेश चटलावार , राष्ट्रीय सेवायोजना विभागाचे स्वंयसेवक ,विध्यार्थी,विद्यार्धीनी उपस्थिती होते.

About The Author

error: Content is protected !!