रामेश्वर बिरादार नागराळकर यांचा सत्कार संपन्न
उदगीर (एल. पी. उगीले) : उदगीर येथील जीवन विमा निगम चे प्रतिनिधी रामेश्वर बिरादार नागराळकर यांनी जीवन विमा निगम यांच्या वतीने ठरवून दिलेले उद्दिष्ट पूर्ण करून उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल आजादी का अमृत महोत्सव या उपक्रमांतर्गत जीवन विमा निगम परिवाराच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उदगीर येथील शाखा व्यवस्थापक जोशी साहेब तसेच जीवन विमा निगम विभागाचे डेव्हलपमेंट ऑफिसर तथा रामेश्वर बिरादार नागराळकर यांचे मार्गदर्शक शिवराज कडगे यांनी रामेश्वर बिरादार यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल कार्यालयामध्येच त्यांना प्रशस्तीपत्र व आजादी का अमृत महोत्सव ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. रामेश्वर बिरादार यांच्या या उत्कृष्ट कार्याबद्दल सर्व मित्र परिवाराच्या वतीने त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
