शिवसेना उपनेत्या सुषमाताई अंधारे यांचा रेणापूर तालुक्याच्या वतीने सत्कार

शिवसेना उपनेत्या सुषमाताई अंधारे यांचा रेणापूर तालुक्याच्या वतीने सत्कार

रेणापूर (प्रतिनिधी) : तालुक्याच्या दौऱ्यावर आलेल्या शिवसेना नेत्या सुषमाताई अंधारे यांचा रेणापूर तालक्यात शिवसेनेच्या वतीने सचिन दाने यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विश्वरत्न, युगप्रवर्तक, ज्ञानाचा अथांग महासागर,भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस महापरिनिर्वाण दिनी पानगाव येथे येवून शिवसेना उपनेत्या सुषमाताई अंधारे यांनी अभिवादन केले.शिवसेना मा उपजिल्हाप्रमुख सचिनभैय्या दाने,शिवसैनिक,भीमसैनिक यांच्या उपस्थितीत विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी बोलताना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी विचार सुषमाताई यांनी मांडले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा देऊन रेणापूर शिवसेनेच्या वतीने सचिनभैय्या दाने यांच्या हस्ते सुषमाताईंचा सत्कार करण्यात आला. स्मृती स्थळास पुष्पहार अर्पण करून भीमवंदना घेण्यात आली. यावेळी शिवसेनेचे भाऊसाहेब माने, पाशाभाई शेख, परमेश्वर माने, चैतन्य होळकर, भगवान शिंदे यांनी स्वागत केले. लातूर ग्रामीण शिवसेनेचे प्रकाशभाऊ अंधारे, अमोल चक्रे, रुपेश चक्रे,विष्णू आचार्य,सूर्यकांत चव्हाण,पप्पू माने,सुकेश भंडारे,आचार्य ताई, गालफाडे यांच्यासह पानगावचे ग्रामस्थ,युवक व महिला यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

About The Author

error: Content is protected !!