कॉक्सिटमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त अभिवादन

कॉक्सिटमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त अभिवादन

लातूर (प्रतिनिधी) : लातूर येथील कॉक्सिट महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस राजर्षी शाहू महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राध्यापक बी. व्ही. झाडके यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी रॉयल एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. एम. आर. पाटील, कॉक्सिटचे प्राचार्य डॉ. एन. एस. झुल्पे, उपप्राचार्य डॉ. व्ही. व्ही. भोसले, उपप्राचार्य डी. आर. सोमवंशी, संगणकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. डी. एच. महामुनी, ट्रेनिंग व प्लेसमेंट प्रमुख प्रा. कैलास जाधव, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. गणेश पवार, प्रा. नितीन वाघमारे, रजिस्ट्रार संतोष कांबळे यांसह प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!