उत्कृष्ठ सामाजिक संस्था पुरस्काराने उदयगिरि लायन्स धर्मादाय नेत्र रुग्णालय गौरवान्वित
उदगीर (एल.पी.उगीले) : मराठवाड्यात नव्हे तर महाराष्ट्रासह कर्नाटक, तेलंगणा व अंध्रप्रदेश या शेजारी राज्यातील सिमा भागातील अंधत्व दुर करण्यासाठी सदैव प्रयत्न करत असलेले उदयगिरी लॉयन्स धर्मादाय नेत्ररूग्नालय उत्कृष्ट सामाजिक संस्था म्हणून गौरवान्वित करण्यात आले आहे. उदयगिरि लायन्स नेत्र रुग्णालय जागतिक पातळीवर गाजलेले असून या नेत्र रुग्णालयाच्या मार्फत होणारे कार्य खुप अभिनंदनास्पद आहे. उदयगिरी लायन्स नेत्र रुग्णालयाचे अध्यक्ष डॉक्टर रामप्रसाद लखोटिया यांच्या संकल्पनेतून अंधत्व मुक्त गाव यासाठी सर्व सहकारी गावा गावात शिबिराच्या माध्यमातून मोफत तपासणीला करून नागरिकांना डोळ्याच्या आरोग्याच्या संदर्भात सजग करत आहेत.
समाजातील बहुसंख्य नागरीकांना मोतीबिंदू शस्त्रक्रियाच्या माध्यमातून गेलेली दृष्टी परत मिळत आहे. उदयगिरी लॉयन्स धर्मादाय नेत्ररूग्नालय उदगीरचे अध्यक्ष डॉ.रामप्रसाद लखोटीया व त्यांचे सर्व सहकारी टिम सतत अंधत्व निवारण करण्यासाठी रात्रदिवस झटत असुन सदरील अंधत्व निर्मुलनाचा महायज्ञ सुरु होवून सतरा वर्ष होऊ लागली आहेत. आजपर्यंत 1,60,000 मोतिबिंदु शस्त्रक्रिया 11 लक्ष मोफत नेत्र तपासणी 4800 पेक्षा जास्त नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन झाले आहे.
या केलेल्या कामाची दखल घेत 3 डिसेंबर या जागतिक दिव्यांग दिनानिमित्त सामाजिक संस्था म्हणून जिल्ह्याधीकारी पृथ्वीराज बी.पी.,मुख्य कार्यकारी अधीकारी अभिनव गोयल,समाजकल्याण अधीकारी संतोषकुमार नाईकवाडी,उपमुख्यअधिकारी नितीन दातार,मुख्य लेखा व वित्तअधिकारी रत्नाकर जवळगे,दिव्यांग सशक्तीकरण केंद्रीय सल्लागार मंडळाचे सदस्य सुरेश पाटील,समाज कल्याण उपायुक्त अविनाश देवसटवार,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख,सवेदना प्रकल्पाचे अध्यक्ष राजेश पाटील यांच्या हस्ते उदयगिरी लाॅयन्स धर्मादाय नेत्ररूग्नालय उदगीर यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.यावैळी रूग्णालयाचे विश्वस्त सहसचिव महेश बसपुरे,सुरेश देबडवार,लाॅ.दिपक जोशी,पी.आर.ओ.गणेश मुंडे उपस्थित होते.
