३३ व्या महाराष्ट्र राज्य किशोर-किशोरी अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धा २०२२ चा शुभारंभ !
अहमदपूर (गोविंद काळे) : लातूर जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने ३३ वी महाराष्ट्र राज्य किशोर – किशोरी अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धा २०२२ महात्मा गांधी महाविद्यालयाच्या प्रारंगणात आयोजित करण्यात आली आहे. आज या कबड्डी स्पर्धा निवड चाचणीचा शुभारंभ प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
अहमदपूर शहरातील महात्मा गांधी महाविद्यालयाच्या मैदानावर दिनांक १५ डिसेंबर ते १८ डिसेंबर या कालावधीत कबड्डी स्पर्धा पार पडणार आहेत. स्पर्धेसाठी मुंबई, पुणे, अहमदनगर, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, औरंगाबाद अशा विविध ठिकाणाच्या २५ किशोर गटाचे तर २५ किशोरी गटाचे संघ स्पर्धेत सहभागी झाले आहेत. यावेळी सर्व मान्यवरांचे, खेळाडूंचे व प्रेक्षकांचे स्वागत करून आमदार बाबासाहेब पाटील यांनी खेळाडूंना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री बाळासाहेबजी जाधव , विचार विकास मंडळाचे अध्यक्ष ॲड. किशनराव बेंडकुळे, सरचिटणीस ॲड. प्रल्हादराव कदम, प्रभारी प्राचार्य डॉ. अनिताताई शिंदे, माजी सभापती शिवानंदजी हेंगणे, लातूर जिल्हा काँग्रेस सरचिटणीस सांबतात्या महाजन, शिवसेना जिल्हाप्रमुख बालाजीराव रेड्डी, तालुका काँग्रेस अध्यक्ष ॲड. हेमंतराव पाटील, महेश अर्बन बँकेचे उपाध्यक्ष निवृत्तीराव कांबळे, तालुकाध्यक्ष शिवाजीराव देशमुख, सिनेट सदस्य प्रा.विनोद माने सर, बाळुभाऊ कासनाळे, माजी सदस्य अभयभैय्या मिरकले, माजी नगरसेवक डॉ.फुजल जहागीरदार, युवक तालुकाध्यक्ष दयानंद पाटील, परमेश्वर सूर्यवंशी, संग्राम गायकवाड,अमितजी रेड्डी, संचालक वसंतराव फड, संचालक सुरेशराव देशमुख, युवक कार्यध्यक्ष प्रशांत भोसले, शहराध्यक्ष अजहरभाई बागवान, तानाजी राजे, इमोरज पटवेकर, फेरोज शेख, चंद्रशेखर भालेराव, अफरोज शेख, क्रीडा समीक्षक, खेळाडू, पत्रकार बांधव आणि प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच कबड्डी असोसिएशन अध्यक्ष श्रीरंगराव बंडापल्ले, उपाध्यक्ष सोपानराव खोत, उपाध्यक्ष रविकांत आकनगिरे, शिव छत्रपती पुरस्कार विजेते सरचिटणीस प्रा.गणपतराव माने सर, कोषाध्यक्ष शंकरराव बुड्डे, सहचिटणीस धर्मपाल गायकवाड, सहचिटणीस लक्ष्मणराव सारोळे, क्रीडा विभाग प्रमुख डॉ. मनोज रेड्डी, क्रीडा विभाग प्रमुख प्राध्यापक शरदराव माने आदी मान्यवर उपस्थित होते.
