स्वप्ने ते असतात जे झोप येऊ देत नाहीत – आय.पी.एस (डि.आय.जि ) मंचक इप्पर

स्वप्ने ते असतात जे झोप येऊ देत नाहीत - आय.पी.एस (डि.आय.जि ) मंचक इप्पर

अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील नागझरीचे या गावचे भूमिपुत्र मंचक इप्पर आय.पि.एस यांची पोलीस उप महानिरीक्षक (DIG) या उच्च पदावर नियुक्ती झाल्यानंर प्रथमच त्यांनी आपल्या गावी भेट दिली. व “स्पर्श” द एम्पटिक टच सेवाभावी संस्था अंतर्गत ज्ञानदीप मिलिटरी पोलीस अकॅडमी अहमदपूर येथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी ते म्हणाले की, नुकतीच महाराष्ट्र शासनाने पोलीस भरती जाहीर केले आहे. महाराष्ट्र भर तरुण व तरुणी ग्राउंड व अभ्यास करत आहेत. तुम्हीं जीव लावुन मेहनत करा, वळेचे नियोजन करा, सातत्य ठेवा, प्रत्येक आठवड्याला अकॅडमी मध्ये परीक्षा घेतली जाते. प्रत्येक वेळा आपले मार्क्स वाढले पाहिजेत. स्वप्न नसतात जे झोपित पाहीले जातात तर स्वप्ने ती असतात ज्यांच्या मुळे तुम्हाला झोप येत नाही हे वाक्य डॉ अब्दुल कलाम यांचे आहे त्या प्रमाणे तुम्हाला पण वर्दीचा स्वप्ने पडली पाहिजे व तुम्ही यशस्वी झाले पाहिजे. कोणत्या पण क्षेत्रात जा तिथे सर्वोच्च व्हा आणि त्या साठी मेहनत हाच पर्याय आहे.
ज्ञानदीप अकॅडमी तुमच्या साठी योग्य ठिकाण आहे. तुम्ही जे स्वप्ने घेऊन आलात ते पूर्ण करून घेत आहे तुम्ही मेहनत केलात तर नक्की यशस्वी होणार असे आय.पि.एस तथा डि.आय. जी मंचक इप्पर म्हणाले. ज्ञानदीप अकॅडमी चे संचालक उध्दव इप्पर यांनी सर्व स्टाफच्या वतीने इप्पर यांचा सत्कार केला. सूत्र संचलन प्रशासकीय अधिकारी नितिन गुट्टे यांनी केले तर आभार नरसिंग पटेवड यांनी मानले. यावेळी उद्योजक व्यंकट इप्पर, जनर्धन भालेराव, लक्ष्मण अलगुले, सतीश इप्पर यांची उपस्थिती होती. या मार्गदर्शनाचा लाभ 400 विद्यार्थ्यांनी घेतला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अकॅडमी चे स्टाफ राम मेजर, जितेंद्र मेजर, अर्चना करपे मॅडम, ऋतुजा बनकर मॅडम संदीप नरोटे, निखिल कोळी यांनी मेहनत घेतली.

About The Author

error: Content is protected !!