डि.आय.जी मंचक इप्पर यांचा जन्म भूमी नागझरी येथे सत्कार

डि.आय.जी मंचक इप्पर यांचा जन्म भूमी नागझरी येथे सत्कार

अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील नागझरी गावचे सुपुत्र, आय.पी.एस. मंचक इप्पर यांची पोलिस उपमहानिरीक्षक (DIG) पदी पदोन्नती होऊन ते प्रथमच आपल्या गावी आले असता, त्यांचा. गावकऱ्यांच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला व पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी ग्रामपंचायत, वि. वि. सोसायटी तसेच सर्व गावकऱ्यांच्या वतीने गावचे प्रथम नागरिक तथा सरपंच रामकिशन सुर्यवंशी, उपसरपंच उध्दव ईप्पर, सोसायटी चे चेरमान अंकूश दौलत इप्पर यांच्या हस्ते मंचक इप्पर यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी सतीश इप्पर, अंकुश आलापूरे, रघुनाथ इप्पर, लक्ष्मण इप्पर, दिलीप उगीले, विठल ईप्पर, बालाजी ईप्पर, तुळशिराम बंडेवार, गंगाधर नकुले, विठ्ठल ईप्पर, नवनाथ ईप्पर, अदीनाथ मुंडे, कोंडीबा ईप्पर, नितीन इप्पर, तुकाराम इप्पर, नागनाथ सुर्यवंशी , राजकुमार इप्पर व गावकरी उपास्थित होते.

About The Author

error: Content is protected !!