निडेबन येथील विजयनगर कॉलनीतील खुल्या जागेच्या संदर्भात आयुक्तांकडून दखल

निडेबन येथील विजयनगर कॉलनीतील खुल्या जागेच्या संदर्भात आयुक्तांकडून दखल

उदगीर (एल.पी.उगीले) : मौजे निडेबन येथील विजयनगर भागातील खुली जागा आणि त्या लगतच्या रस्त्यावर गैरकायदेशीर मार्गाने काही लोक लक्ष ठेऊन आहेत,त्या मुळे ती खुली जागा सर्वसामान्य नागरिकांसाठी कायम खुली राहावी. या जागेचे नामांतर केले जाऊ नये. या दृष्टीने रणरागिणी उषाकिरण बिरादार यांनी 2002 पासून वरिष्ठ पातळीवर अर्ज फाटे केलेले आहेत. 19 सप्टेंबर 2022 रोजी ही उषाकिरण गोविंदराव बिरादार आणि इतर नागरिकांनी विजयनगर कॉलनीतील हनुमान मंदिराजवळील 74 बाय 74 ही खुली जागा आणि त्या लगतचा रस्ता हा नागरिकांसाठी खुलाच राहावा. या जागेचे नामांतर करण्याचा कट उधळून लावावा, अशा पद्धतीची मागणी करण्यात आलेली आहे.
सदरील अर्जाची दखल घ्यावी, आणि योग्य ती कारवाई करावी. अशा पद्धतीचे आदेश विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद यांच्याकडून मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद लातूर यांना एका पत्रांमुळे कळवले आहे.
सदरील पत्रात ग्रामस्थांनी केलेल्या अर्जाची दखल घेण्याची सूचनाही केलेली आहे. विजय नगर कॉलनी येथील खुली जागा आणि त्या लगतच्या रस्त्याची जागा नागरिकांसाठी खुली राहणे आवश्यक असल्याने त्या अनुषंगाने ग्रामपंचायतीने योग्य ती कारवाई करावी. अशा सूचना औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयाचे उपायुक्त सुरेश बेदमूथा यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला एक प्रत देऊन, योग्य ती कारवाई करण्यासाठी सुचित केले आहे. ग्रामपंचायतच्या हद्दीतील खुल्या जागेवर अनेकांच्या नजरा असून ही खुली जागा घशात घालण्यासाठी नामांतर करण्याचे प्रयत्नही चालवले असल्याची चर्चा निडेबन गावात चालू आहे. तरी योग्य ती कारवाई केली जावी, अशा पद्धतीच्या सूचना आयुक्तालयातून आल्यामुळे निडेबन येथील खुली जागा आणि रस्ता सुरक्षित राहील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

About The Author

error: Content is protected !!