प्राध्यापक डॉक्टर जवळगेकर यांना राष्ट्रीय पुरस्कार

प्राध्यापक डॉक्टर जवळगेकर यांना राष्ट्रीय पुरस्कार

लातूर (एल. पी. उगिले) : डॉ.शिवाजीराव जवळगेकर यांना समृद्धी प्रकाशन हिंगोली चा सुप्रतिष्ठित असा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे .
दयानंद कला महाविद्यालय लातूर येथे डॉ. शिवाजीराव जवळगेकर पदवी व पदव्युत्तर मराठी विभागात संशोधन मार्गदर्शक, विभाग प्रमुख आणि प्रोफेसर म्हणुन कार्यरत आहेत.
यशवंतराव चव्हाण समाज विकास प्रतिष्ठान, गुरु करिअर अकॅडमी,साहित्यभूषण कला अकादमी व संशोधन केंद्र या विविध संस्थांच्या माध्यमातून सामाजिक चळवळीत डॉ. शिवाजीराव जवळेकर हे सतत अग्रेषित असतात.अध्ययन, अध्यापना बरोबरच सामाजिक बांधिलकी जोपासत विद्यार्थ्यांना सतत प्रेरणादायी मार्गदर्शन करणारे डॉ.शिवाजीराव जवळगेकर यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात येत आहे. याबद्दल त्यांचे सर्वच क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.
एक विचारवंत, उत्कृष्ट वक्ता, सामाजिक, शैक्षणिक, साहित्य, कला, राजकारण या सर्व क्षेत्रात त्यांचे कार्य मराठवाड्यात गाजलेले असून ते एक प्रथित यश समाजसेवक आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन राज्यपातळीवर त्यांना पुरस्कार देण्यात आला. त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

About The Author

error: Content is protected !!