राज्यस्तरीय अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी मारोती कसाब
अहमदपूर ( प्रतिनिधी) : जिंतूर येथे होणाऱ्या एकोणिसाव्या राज्यस्तरीय अण्णाभाऊ साठे विचार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल विद्रोही कवि तथा समीक्षक डॉ. मारोती कसाब यांचा महात्मा फुले महाविद्यालयात प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ वसंत बिरादार पाटील हे होते तर मराठी विभागातील प्राध्यापक डॉ. अनिल मुंढे यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सतीश ससाणे, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. पांडुरंग चिलगर, संस्कृत विभाग प्रमुख डॉ. प्रशांत बिरादार, ग्रंथपाल प्रा. परमेश्वर इंगळे, कार्यालयीन अधीक्षक प्रशांत डोंगळीकर, अजय मुरमुरे, चंद्रकांत धुमाळे, शिवाजी चोपडे, चंद्रकांत शिंपी यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.
