भाजपच्या वतीने पाकीस्तानच्या परराष्ट्रमंत्र्याचा अहमदपुरात निषेध

भाजपच्या वतीने पाकीस्तानच्या परराष्ट्रमंत्र्याचा अहमदपुरात निषेध

अहमदपुर (गोविंद काळे) : भारतीय जनता पक्षाच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांचा जाहीर निषेध व्यक्त करून परराष्ट्रमंत्र्याच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करुन बिलावल भुट्टो यांच्या प्रतिमेचे दहन करून पाकीस्तानचा निषेध व्यक्त करण्यात आला.
दहशवादाचे आश्रयस्थान असलेल्या पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांनी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर अशांतता पसरवण्याच्या दृष्टिकोणातून भारत देशाबद्दल व जगात लोकप्रिय असलेले पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या विरोधात अपशब्द वापरुन अपमानास्पद वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ आज त्याचा निषेध म्हणून भारतीय जनता पक्षाच्या वतीने अहमदपूर येथे निषेध आंदोलन करुन पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा जय घोष करण्यात आला.
सदरील आंदोलनात भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री विनायकराव पाटील, माजी आमदार बब्रुवान खंदाडे, भाजपचे प्रदेश प्रवक्ते गणेश दादा हाके, भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस दिलीपराव देशमुख, जिल्हा चिटणीस शरद जोशी, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंदराव गिरी, तालुका अध्यक्ष हणमंत देवकते, अँड.अमित रेड्डी, ज्ञानोबा बडगिरे , डॉ.सिद्धार्थकुमार सुर्यवंशी, राहुल शिवपुजे, अँड.किशोर कोरे, माऊली जाधव, बाबुराव पाटील, पांडुरंग गलाले, अँड.निखील कासनाळे, पांडुरंग लोहकरे, बबन नवटक्के,अंनत इजारे,परमेश्वर पाटील यांच्या सह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या निषेध आंदोलनात सहभागी झाले होते.

About The Author