अहमदपूरच्या महात्मा फुले महाविद्यालयाची कु. कोमल पोले ‘संस्कृत’ च्या गोल्ड मेडलची मानकरी

अहमदपूरच्या महात्मा फुले महाविद्यालयाची कु. कोमल पोले 'संस्कृत' च्या गोल्ड मेडलची मानकरी

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयाची आदर्श विद्यार्थिनी कु. कोमल संभाजी पोले ही स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या उन्हाळी २०२२ परीक्षेमध्ये विद्यापीठातून बी. ए. मध्ये सर्व तृतीय आली असून, संस्कृत विषयामध्ये सर्वप्रथम आली आहे. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या कुशल नेतृत्वाखाली स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात उच्च शिक्षण क्षेत्रामध्ये ‘फुले पॅटर्न ‘ निर्माण केला आहे. सन २००९ पासून गुणवत्ता यादीत तसेच २०१६ पासून विद्यापीठात बी.ए. विद्याशाखेत प्रथम, द्वितीय, तृतीय तसेच, विविध विषयांमध्ये सुवर्णपदक प्राप्त करण्याचा मान महात्मा फुले महाविद्यालयाला मिळाला आहे. हिच यशाची परंपरा कायम ठेवत उन्हाळी २०२२ च्या परीक्षेत बी.ए. कला शाखेतून विद्यापीठातून प्रथम येण्याचा मान पुन्हा एकदा कु. समीक्षा शेषराव कांबळे या विद्यार्थिनींना मिळाला असून, याच परीक्षेत विद्यापीठातून सर्व तृत्तीय येण्याचा मान व संस्कृत विषयांमध्ये सर्वप्रथम येण्याचा मान कु. कोमल संभाजीराव पोले या विद्यार्थिनीला मिळाला आहे. डॉ. गोपाळराव पाटील अध्यक्ष, शिवछत्रपती शिक्षण संस्था लातूर यांच्या वतीने प्रयागबाई विठ्ठलराव पाटील यांच्या नावे दिला जाणारा ‘बेस्ट ग्रॅज्युएट स्टुडन्ट इन संस्कृत लँग्वेज ‘ या पुरस्काराची मानकरी कु. कोमल पोले ठरली आहे. या यशस्वी विद्यार्थिनींचे किसान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीरचे अध्यक्ष श्रीरंगराव पाटील एकंबेकर, सचिव ज्ञानदेव झोडगे तसेच सर्व सन्माननीय पदाधिकारी, प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील, उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी, संस्कृत विभाग प्रमुख डॉ. प्रशांत बिरादार यांच्यासह सर्व प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी तसेच आजी – माजी विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले.

About The Author

error: Content is protected !!